शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

नागपूरच्या पोरी हुश्शार

By admin | Updated: May 29, 2016 02:55 IST

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले.

नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले. निकालांमध्ये यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. उपराजधानीत ‘सीबीएसई’च्या सुमारे ५० शाळा असून यातील जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सुरुवातीला गुणांऐवजी ‘ग्रेड’वर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे निकाल पाहताना पालक व विद्यार्थ्यांसोबतच शाळांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे गुण आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले.नारायण विद्यालयम्चा श्रेयस गाडगे याने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असली तरी गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. नागपूरच्या सेंटर पॉईंट शाळेची विद्यार्थिनी अमिषा केळकर, नारायणा विद्यालयाचा हितेश कांडला व झेव्हिअर्स स्कूल, हिंगणा रोड येथील विद्यार्थी शुभंकर बॅनर्जी हे ९९.४ टक्के (४९७) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नारायणा विद्यालयाचे शिवम चौबे, तृषा साखरकर व भवन्स विद्यामंदिर, आष्टी येथील दीक्षा पांडे हे संयुक्तरीत्या तिसरे आहेत. या तिघांनाही ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त झाले. (प्रतिनिधी)‘सीजीपीए’मध्येदेखील विद्यार्थिनींचीच बाजीनागपुरातील ह्यसीबीएसईह्णच्या बहुतेक सर्व शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे १० ह्यसीजीपीए’ म्हणजेच सर्वोत्तम ‘ग्रेड’ असलेल्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे. विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १० आहे. विद्यार्थ्यांची धावपळनागपुरातील सीबीएसई शाळा चेन्नई विभागाच्या अंतर्गत येत असल्याने निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. निकालाची माहिती समजतात विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये विचारपूस करण्यास सुरुवात केली . मोबाईलवर एसएमएसने निकाल पाहण्याची सुविधा नसल्याने अनेकांनी तर आधी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. बाहेरगावी असलेल्यांनी इतर मित्रांकडून निकाल काय हे माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला.