शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रंगूनवालाचा गरिबांना चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:28 IST

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरगाव येथे अस्तित्वात नसलेले भूखंड विकून १३० ते १४० भूखंडधारकांना कोट्यवधी रुपयांनी फसवल्याचा आरोप असलेल्या रंगूनवाला याला ....

ठळक मुद्दे१४० भूखंडधारकांना फसविले: न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

राहुल अवसरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरगाव येथे अस्तित्वात नसलेले भूखंड विकून १३० ते १४० भूखंडधारकांना कोट्यवधी रुपयांनी फसवल्याचा आरोप असलेल्या रंगूनवाला याला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. त्याला कोणताही दिलासा न देता त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.अब्दुल अजीज अब्दुल शकूर रंगूनवाला (७१), असे या आरोपीचे नाव असून तो काटोल रोडवरील राजनगरच्या सोएल मंझिल येथील रहिवासी आहे. पीडित भूखंडधारक हमीदखान अहमदखान यांच्या तक्रारीवरून आरोपीची ही बनवाबनवी उजेडात आली.रंगूनवाला याने मौजा बोरगाव येथील ३.५० एकर जमीन रजिस्टर्ड खरेदीपत्राद्वारे चंदन नगरारे आणि इतरांकडून विकत घेतली होती. समाजभूषण सोसायटी स्थापन केली. तो या सोसायटीचा सचिव झाला. त्याने ३.५० एकर जागेचा गैरफायदा घेत प्रत्यक्षात १० एकर जागेवर ले-आऊट पाडून ते २०० भूखंडधारकांना विकले आणि १३०-१४० भूखंडधारकांची फसवणूक केली आहे.हमीदखान अहमदखान यांनी या ले-आऊटमधील १४३ ए क्रमांकाचा १२०० चौरस फुटाचा भूखंड रंगूनवालाकडून आपली पत्नी सायराबानो यांच्या नावे खरेदी केला होता. या भूखंडाची रजिस्ट्री ३१ आॅक्टोबर १९९२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ७ येथे केली होती. आरोपीने हाच भूखंड आणखी दोन जणांना विकल्याचे समजल्यावरून हमीदखान यांनी त्याला जाब विचारला होता.त्याने आपली चूक मान्य केली होती आणि दुसरा भूखंड देतो, असे त्यांना सांगितले होते. त्याने हमीदखान यांच्याकडून २ हजार रुपये घेऊन ६ मे १९९५ रोजी रजिस्टर्ड दुरुस्तीपत्र करून ‘१४३ एच’ हा भूखंड दिला होता. आरोपीने हा भूखंड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर दाखवून ताबापत्र दिले होते. मात्र कोणतेही मार्किंग करून दिले नव्हते. २००० मध्ये हमीदखान यांनी हा भूखंड विक्रीस काढला. तो ले-आऊटमध्ये दिसून आलेला नव्हता. आपणास अस्तित्वात नसलेला भूखंड विकून फसवणूक समजातच त्यांनी रंगूनवालाच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने धमकी देऊन भूखंड देण्यास नकार दिला होता. त्यांच्या तक्रारीवरून रंगूनवाला याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक करीत असता रंगूनवाला याचे मोठे घबाड या पथकाला आढळून आले. आरोपी रंगूनवाला याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील लीलाधर घाडगे यांनी काम पाहिले.या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. पाटील हे आहेत.