शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पोलिंग पार्टी मतदान केंद्रांवर दाखल : २३ हजारावर कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.

ठळक मुद्दे‘मॉक पोल’ने होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.बुधवारी सकाळपासूनच विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम पसिरात ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट आदींसह निवडणूक मतदानाचे साहित्य वितरित करण्यात आले. पोलिंग पार्टी आपापल्या मतदाननिहाय साहित्य घेऊन रवाना झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 यासोबत पोलीस आणि इतर कर्मचारी वेगळे आहेत. सर्व कर्मचारी आपपल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून, त्यांनी सायंकाळीच मतदान केंद्र तयार करून घेतले. सायंकाळी तसा अहवालही सादर केला. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीही मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली.सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदानमतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर कुणालाही मतदान करता येणार नाही.जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम सुरक्षित पोहोचविणार 
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील. या कंटेनरवर जीपीएस व्यवस्था असेल. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या कंटेनरचा पाठलागही करता येऊ शकेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवल्या जातील, तिथे कुठलीही लाईव्ह वायरिंग राहू नये. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारची वायरिंग नाही. आतमध्ये सीसीटीव्ही नाही. परंतु परिसरात मात्र सीसीटीव्ही आहेत. तसेच कळमना येथील दोन्ही स्ट्राँग रूम हे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने घेरलेले राहील.कळमना येथे मतमोजणी 
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागपूर व रामटेक या दोन्ही मतदार संघातील मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे दोन्ही मतदार संघासाठी दोन स्वतंत्र व्यवस्था आहे. कळमना येथील मतमोजणी केंद्राची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.एकूण मतदारनागपूर : २१, ६०,२३२रामटेक : १९,२१,०४७एकूण मतदान केंद्रनागपूर : २०५६रामटेक : २३६४एकूण कर्मचारी - दोन्ही मतदार संघात २३ हजार कर्मचारीपोस्टल बॅलेटदोन्ही मतदार संघात एकूण १९,५८० पोस्टल बॅलेट मतदार असून त्यापैकी रामटेक येथे १०,८४८ आणि नागपूरमध्ये ८,९३२ पोस्टल मतदार आहेत. या सर्वांना पोस्टल बॅलेट पाठवण्यात आलेले आहेत. निवडणूक विभागातर्फे निवडणूक कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्यासाठी सुविधा केंद्र उघडण्यात आले होते. यात १०१ लोकांनी मतदान केले. उर्वरित पोस्टल मतदाराला २३ मेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. परंतु २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत आपले पोस्टल मत संंबधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल.अशी आहे वाहन व्यवस्था 
८०० जीप,५२० बसेस,१०० कार, १०० ट्रक,२४ कंटेनर ,२४ अ‍ॅम्बुलन्स आणि १३ अग्निशमन गाड्या

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019