शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हस्तक्षेपामुळे परागीकरण धोक्यात

By admin | Updated: February 27, 2016 03:23 IST

परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे.

आंबेडकर महाविद्यालय राष्ट्रीय परिषद : रेनी बोर्गीज यांचे प्रतिपादननागपूर : परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे. यात मानवी हस्तक्षेप सध्या कमी असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परागीकरण घडवून आणणारे घटक नामशेष होत आहे. परिणामी नैसर्गिक परागीकरणच धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन बंगळुरु येथील इकॉलॉजिकल सायन्सेस सेंटरचे अध्यक्ष डॉ. रेनी बोर्गीज यांनी येथे केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीतर्फे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर व राष्ट्रीय विज्ञान परिषद नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल इयर आॅफ पल्सेस-२०१६’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ‘इनोव्हेशन इन अ‍ॅग्री-बायोसायन्सेस’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. केशव क्रांती, डॉ. सुधोमय मंडल, डॉ. अलका चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. डी. बेगडे, प्रो. सुभाष सोमकुंवर, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, व्ही.व्ही. चिकाटे व्यासपीठावर हजर होते. डॉ. शरद निंबाळकर यांनी हरित क्रांतीवर भर दिला. कृषी क्षेत्रातील नैसर्गिक घटकांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक प्रो. सुभाष सोमकुंवर यांनी केले. डॉ. वर्षा देशपांडे यांनी संचालन केले. डॉ. भूमी मेहरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)