शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण अतृप्त आत्म्यांचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:12 IST

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात.

ठळक मुद्देनितीन गडकरी : मनीष अवस्थी व अशोक वानखेडे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात. समाजात चांगले काम करणाºयांचा सत्कार होत नाही आणि चुकीचे काम करणाºयांना शिक्षा मिळत नाही, हीच खºया अर्थाने समाजातील समस्या आहे, असे रोखठोक मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी आणि स्तंभलेखक व एबीपी न्यूज वाहिनीवरील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांना शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पुरस्कार-२०१६ प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते. पंचशील चौक धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे होते. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय कुवळेकर हे प्रमुख अतिथी होते. गिरीश गांधी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर होते.नितीन गडकरी म्हणाले, राजकारण म्हणजे केवळ सत्ता स्थापन करणे नव्हे. राजकारणाची ही व्याख्या बदलायला हवी. समाजकारण हेच राजकारण झाले पाहिजे. जी व्यक्ती आपला कामधंदा व घरदार व्यवस्थित सांभाळू शकत नाही, ती देशाची सेवाही करू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही सत्कारमूर्ती हे आपले चांगले मित्र आहेत. आपल्या माणसाचा सत्कार होत असल्याचा आनंद आहे. दिल्लीमध्ये विदर्भातील पत्रकार मंडळी आपल्या माणसांची काळजी घेतात. राजकारणावर आपली मते ताकदीने मांडतात, पण तितकीच काळजी सुद्धा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.विजय कुवळेकर यांनी प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगून समाजात चे जांगले आहे, ते दिसू द्या असे आवाहन केले.माझ्या जिवंतपणी विदर्भ राज्य करून द्याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात दिल्ली आणि मुंबई नागपुरात आहेत. त्यामुळे आता माझ्या जिवंतपणी तरी विदर्भ राज्य करून द्या’, असे भावनिक आवाहन केले.