शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसालाच चाकू दाखवून लुटले, पत्नीचे मंगळसूत्र व रोख रक्कम हिसकावून नेली

By admin | Updated: July 10, 2017 23:07 IST

पत्नीसोबत दुचाकीवर बसून घरी जात असलेल्या पोलीस शिपायाला रस्त्यात अडवून दोन लुटारूंनी त्याच्या गळ्याला चाकू लावला आणि त्याचा मोबाईल

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - पत्नीसोबत दुचाकीवर बसून घरी जात असलेल्या पोलीस शिपायाला रस्त्यात अडवून दोन लुटारूंनी त्याच्या गळ्याला चाकू लावला आणि त्याचा मोबाईल, रोख चार हजार रुपये तसेच त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. रविवारी दुपारी नागपूर जबलपूर मार्गावर ही घटना घडली.  चक्क पोलिसालाच चाकूचा धाक दाखवून लुटल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.
मनोज प्रकाश गजभिये (वय ३४) असे फिर्यादी पोलिसाचे नाव आहे. ते पोलीस मुख्यालयात कार्यरत असून, गोंडेगाव-कन्हान येथे राहतात. रविवारी दुपारी ते पत्नीसह टाकळघाटला विक्तूबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी ३ च्या सुमारास ते दुचाकीवरून (एमएच ४०/ एएच ४९८६) गावाकडे परत जात होते. नागपूर - जबलपूर महामार्गावर मागून पाठलाग करीत आलेल्या लुटारूंनी तरोडी-कापसी पुलाजवळ गजभियेंच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी करून त्यांना रोखले. त्यानंतर लुटारूंनी गजभियेंच्या गळ्याला चाकू लावला. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन  गजभियेच्या पाकिटमधील चार हजार रुपये, मोबाईल आणि त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल हिसकावून लुटारू पळून गेले. या प्रकारामुळे गजभिये दाम्पत्य दहशतीत आले. भांबावून गेल्यामुळे काही वेळ त्यांना काही सुचलेच नाही. काही वेळेनंतर रस्त्याने जाणाºयांना थांबवून त्यांनी लुटमारीची घटना सांगितली आणि लुटारू ज्या दिशेने पळाले त्या दिशेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास वाया घातल्यानंतर ते कळमना ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहायक पोलीस  निरीक्षक मारुती मुंडे यांनी गुन्हा दाखल करून लुटारूंची शोधाशोध सुरू केली.
भलत्याचीच निघाली दुचाकी-
लुटारूंनी या गुन्ह्यात जी दुचाकी वापरली होती. तिच्या नंबरप्लेटवरून कळमना पोलिसांनी दुचाकीधारकाचे घर गाठले. त्याला ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता संबंधित दुचाकीधारकाचा या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी बनावट नंबर प्लेट वापरून हा गुन्हा केल्याचेही त्यातून उघड झाले. त्यामुळे आरोपी सराईत गुन्हेगार असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.