शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

त्या पोलीस उपनिरीक्षकाने अधिकाराचा दुरुपयोग केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

नागपूर : एका गरीब महिला विक्रेत्याचा भाजीपाला अमानुषपणे रोडवर फेकून जरीपटकाच्या पोलीस उपनिरीक्षकाने कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग केला, असे मत ...

नागपूर : एका गरीब महिला विक्रेत्याचा भाजीपाला अमानुषपणे रोडवर फेकून जरीपटकाच्या पोलीस उपनिरीक्षकाने कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग केला, असे मत शहरातील प्रसिध्द फौजदारी विधिज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच, संबंधित पोलीस उपनिरीक्षक या कृतीसाठी सामान्य व्यक्तीप्रमाणेच कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले.

अ‍ॅॅड. शशिभूषण वहाणे यांनी कायदेशीर अधिकारांचा कायद्याने ठरवून दिलेल्या पध्दतीनेच उपयोग करणे बंधनकारक आहे, असे सांगितले. बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. परंतु, ते हा अधिकार वापरताना कायदा हातात घेऊ शकत नाही. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने भाजीपाला रोडवर फेकून कायद्याची पायमल्ली केली. त्याकरिता पोलीस उपनिरीक्षकावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी या घटनेचा निषेध केला. ही घटना मानवी संवेदना दुखावणारी आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला भाजीपाला जप्त करून महिला विक्रेत्यावर गुन्हा नोंदवता आला असता. परंतु, त्याने तसे न करता महिला विक्रेत्याचे आर्थिक नुकसान केले. या कृतीद्वारे पोलीस उपनिरीक्षकाने स्वत: गुन्हा केला, असे अ‍ॅड. डागा यांनी पुढे सांगितले.

पोलिसांना एखाद्या व्यक्तीवर कारवाई करताना कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने या कायदेशीर तरतुदीची पायमल्ली केली. भाजीपाल्याची नासधूस करून महिला विक्रेत्याचे आर्थिक नुकसान केले. या कृतीसाठी पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली गेली पाहिजे, असे मत अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी व्यक्त केले.

अ‍ॅड. अनिल ढवस यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची कृती गैरव्यवहार असून त्यासाठी तो विभागीय चौकशी व गुन्हा दाखल होण्यास पात्र आहे अशी माहिती दिली. पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. परंतु, हा अधिकार वापरताना माणुसकी जपणेही आवश्यक आहे. पोलीस अशाप्रकारे कुणाचे नुकसान करू शकत नाही याकडेसुध्दा अ‍ॅड. ढवस यांनी लक्ष वेधले.