शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

शुटिंगसाठी ड्रोन वापरायचा असेल तर पोलीस परवानगी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणाल तर दुसरा जन्म आणि हा क्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणाल तर दुसरा जन्म आणि हा क्षण संस्मरणीय ठरविण्यासाठीची धडपड प्रत्येकाचीच असते. यात महत्त्वाचा भाग असतो तो फोटोग्राफरचा. विवाहसोहळ्यात हा अत्यंत महत्त्वाचा घटक. फोटोग्राफरकडे असलेला कॅमेरा हे असे गॅझेज आहे, ज्यातून तत्कालीन प्रसंगात टिपलेली क्षणचित्रे वर्तमानातून भुतकाळात डोकावण्यास बाध्य करतात. अवजड कॅमेराभोवती असलेल्या कापडात शिरून फोटो क्लिक करणाऱ्या काळापासून ते रोल कॅमेरा, डिजिटल कॅमेराचा आणि हल्ली मोबाइल कॅमेराचा युग सर्वांनी बघितला. त्याला जोड म्हणून आता उडते अर्थात ड्रोन कॅमेरेही अवतरले आणि चित्रीकरणाच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती आली. मात्र, ड्रोन कॅमेरे वापरताना वैश्विकरणाच्या काळात प्रचंड सजगता बाळगणे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे, सुरक्षा यंत्रणाही सजग झाल्या आणि विवाह सोहळ्यांची म्हणा व अन्य कोणत्याही उपक्रमाचे चित्रीकरण ड्रोन द्वारे करायचे असेल तर पोलीस परवानगी महत्त्वाची ठरत आहे.

पोलीस ठाण्यात करावा अर्ज

विवाह सोहळा म्हणा वा प्री-वेडिंग शुट किंवा अन्य कोणतेही उपक्रम, यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना पोलीस परवानगी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण करायचे असेल, त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात विधिवत अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये चित्रीकरणाची तारीख, स्थळ आणि चित्रीकरण कशाचे करायचे (विवाह, प्री-वेडिंग वा अन्य), ते किती वेळ करायचे, त्यात सहभागी कुटुंब वा अन्य आदींची माहिती सादर करावी लागते. विशेष म्हणजे, यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. दुसरे कुठले व्यावसायिक उपक्रम असतील तर त्यानुसार शुल्काची परिभाषा वेगळी आहे. पोलीस ठाण्याकडून परवानगी सहज आणि तत्काळ दिली जाते.

कारवाई टाळण्यासाठी परवानगी महत्त्वाची वर्तमानकाळात होत असलेल्या घडामोडी म्हणा व सुरक्षेचे महत्त्व, याबाबत नागरिकही सुजाण झाले आहेत. ड्रोन कॅमेरा हवेत असतो आणि त्यामुळे, लोकांच्या दृष्टीस केवळ तोच येतो. बरेचदा अतिमहत्त्वाच्या स्थळांशेजारी, जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल व रेशिमबाग येथील कार्यालय, विमानतळ, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन, बसस्टेशन आदी स्थळांभोवती ड्रोन गिरक्या खातांना दिसला की लोक अलर्ट मोडमध्ये जातात. तेव्हा ते तत्काळ पोलिसांत तक्रार करतात किंवा शंका व्यक्त करतात. अशावेळी पोलीस कारवाई करतात. रितसर परवानगी असली तर कारवाई टाळता येते. म्हणून कारवाई टाळण्यासाठी परवानगी महत्त्वाची असल्याचे मत शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अटेंडन्टनी दिली.

ड्रोन उडविण्याचे परवाने मोजक्याच फोटोग्राफरकडे

शहरात हजाराच्या वर नामांकित फोटो स्टुडीओज आहेत. शिवाय, या क्षेत्रात करिअर करणारे दररोज नवे फोटोग्राफर उतरत आहेत. त्या प्रत्येकाजवळ गोमास्ता किंवा उद्यम आधार कार्ड आहेत. मात्र, ड्रोन उडविण्याचे परवाने काही मोजक्याच फोटोग्राफरकडे आहेत. त्यात डाॅक्युमेंटरी मेकर, चित्रपटांचे चित्रीकरण करणारे आणि काही मोठ्या स्टुडिओजचा समावेश आहे. शहरात विवाह किंवा प्री-वेडिंगसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्यांना परवान्याची अट शिथिल आहे.

१५ ते ५० हजार रुपये चार्ज

विवाह सोहळ्याचे स्वरूप, प्री-वेडिंगचे स्वरूप यावर ड्रोन कॅमेरा शुटिंगचे चार्ज निश्चित होतात. प्री-वेडिंगचे शुटिंग चित्रपटाच्या शुटिंगप्रमाणे असते. शिवाय, आपले हे क्षण आकर्षक असावे, असे प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यानुसार १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत चार्जेच घेतले जातात. परवानगीसाठीही कसरत करावी लागत नाही. पोलीस सुरक्षेचे नियम सांगतात आणि हमीपत्र घेऊन परवानगी देतात.

-जीवक गजभिये, फोटोग्राफर

..................