शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

चाकु घेऊन फिरला पोलिसांनी तुरुंगात टाकला; दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2024 19:59 IST

शुक्रवारी १२ एप्रिलला सायंकाली ६.१५ ते ७.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते.

नागपूर : चाकु घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक करून त्याच्या ताब्यातून चाकु आणि दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तौसिफ इब्राहिम शेख (२२, रा. बाजार चौक, मनसर रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या ताजबाग येथे राहतो.

शुक्रवारी १२ एप्रिलला सायंकाली ६.१५ ते ७.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना इतवारी मालधक्काकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी आरोपी प्लेझर गाडीवर चाकु घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन आरोपीची व त्याच्या वाहनाची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीत ३०० रुपये किमतीचा लोखंडी चाकु आढळला. दुचाकीबाबत विचारना केली असता त्याने कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आरोपीच्या ताब्यातून चाकु व दुचाकी असा ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.