शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

पोलिसांची साथ, गुन्हेगार मोकाट

By admin | Updated: May 31, 2017 03:00 IST

शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी

वरिष्ठांना जुमानेना : कसे होणार क्राईम कंट्रोल? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांना दाद देत नाहीत. ते वरिष्ठांच्या आदेशांना न जुमानता कुख्यात गुंडांची साथ देतात. वाडी पोलीस कुख्यात जर्मन जापान गुंडांच्या टोळीविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणातून याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस झाले तरी वाडी पोलिसांनी कुख्यात जर्मन जपान टोळीच्या गुंडांविरुद्ध कारवाई केली नाही. वाडी पोलीस ठाणे अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असते. ठाण्याच्या आजूबाजूला अवैध धंद्यांची रेलचेल आहे. पोलिसांनी आजूबाजूला मटका अड्डेवाले, बुकी, अवैध दारू विक्री करणारांना मूक परवाने दिले आहेत. पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे औद्योगिक कंपन्या आणि मोठमोठ्या गोदामात नेहमीच चोऱ्या होत असतात. या भागात ट्रक चालकांना शस्त्राच्या धाकावर मारहाण करून लुटण्याचे गुन्हेही नेहमीच घडतात. वाडी पोलीस तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पार पाडतात. त्यानंतर प्रकरण थंडबस्त्यात पडते. कुख्यात जर्मन जापान टोळीविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचेही असेच झाले आहे. १९ मेच्या दुपारी १.३० वाजता ते अमरावती रोड, दत्तवाडीतील श्रीराम आॅटो ब्रदर्स गॅरेज येथे संतोषसिंग काश्मीरसिंग गादरी (वय ३४, रा. नारी) हे ट्रकमालक बसून होते. तेथे कुख्यात जर्मन जपान टोळीचे गुंड कल्लू इमरान खान (वय ३५), सोनू शर्मा (वय २८) आणि त्याचे सशस्त्र साथीदार स्वीफ्ट डिझायर कार (एमएच ३१/ सीआर २८६२) ने आले. त्यांनी आम्हाला एक लाख रुपये खंडणी दे, अन्यथा तुझा आयशर ट्रक सिझिंग करून आम्ही घेऊन जाऊ’ अशी भीती दाखविली. एवढेच नव्हे तर गादरी यांच्याकडून जबरदस्तीने घटनास्थळी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना एका एटीएम सेंटरमध्ये नेऊन तेथून पाच हजार रुपये काढण्यास भाग पाडले. हे दहा हजार रुपये हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी गादरी यांना धाक दाखवून जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून कळमन्यातील महालगाव (कापसी) येथे नेले. तेथून गादरी यांचा आयशर ट्रक घेऊन गेले. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे गादरी गप्प बसले. याच दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जर्मन जपान टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करून शमसुन्निसा नामक निराधार महिलेला तिची जमीन परत करण्यास मदत केली. हे वृत्त कळल्यामुळे गादरी यांनी २२ मे रोजी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली. तिची शहानिशा केल्यानंतर एसीपी वाघचौरे यांनी वाडी पोलीस ठाण्यात यासंबंधाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. पोलिसांचा निर्ढावलेपणा, वरिष्ठांची हतबलता वाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून जर्मन जपान टोळीच्या मुसक्या बांधण्याऐवजी या टोळीला मदत केली. गादरी यांच्या फोनवरून वाडी पोलिसांनी आरोपींना फोन करून तुमच्याविरुद्ध अशी तक्रार आल्याची माहिती जर्मन जपान टोळीच्या गुंडाला दिली. याच पोलिसांनी झाले गेले विसरून समेट करून आपला ट्रक घेऊन जा, असा सल्लाही गादरी यांना दिला. तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली. काही पत्रकारांनी या प्रकरणाची माहिती विचारल्याने वाडी पोलिसांनी जर्मन जपान टोळीच्या कल्लू खान आणि सोनू शर्माविरुद्ध कलम ३८४,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला. आता या प्रकरणाला १० दिवस झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केलेली नाही. हिसकावून नेलेल्या ट्रकचे काय झाले, ते कळायला मार्ग नाही. दुसरीकडे फिर्यादींना गुंडांकडून धमक्या मिळत आहे. त्यामुळे गादरी दहशतीत आले आहे. वाडी पोलिसांकडून कुख्यात जर्मन जपान टोळीच्या गुंडांची अशी पाठराखण केली जात असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी हतबल झाल्यासारखे बसले आहेत.