शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:13 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे आठ दिवसांपासून होता इतरांसोबत ड्युटीवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संबंधित पोलिसाच्या संपर्कातील इतर पोलिसांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी होत आहे.रेल्वेस्थानकावरील लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कोरोना पॉझिटिव्ह निघालेला पोलीस गुरुवारपर्यंत कामावर होता. दरम्यान, ठाण्यातील इतर पोलिसांच्या तो संपर्कात आला. तब्येतीचा त्रास होत असल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. त्यात तो पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यास मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दहशत निर्माण झाली. गुरुवारपर्यंत ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अनेक पोलीस त्याच्या संपर्कात आले. परंतु शुक्रवारी एकाही पोलिसाला होम क्वारंटाईन किंवा त्यांची चाचणी करण्याची कारवाई न केल्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संपर्कातील पोलिसांचा शोध घेणार‘कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पोलीस शिपायाच्या संपर्कातील इतर पोलिसांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल.’विश्व पानसरे, लोहमार्ग पोलीस अधीक्षक, नागपूर