शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कायदा हातात घेता येणार नाही

By admin | Updated: July 28, 2016 02:47 IST

कळमना पोलीस ठाण्यात सूडभावनेने एफआयआर नोंदविण्यात आल्याचा आरोप करून दोन भंगार व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

नागपूर : कळमना पोलीस ठाण्यात सूडभावनेने एफआयआर नोंदविण्यात आल्याचा आरोप करून दोन भंगार व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी बुधवारी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता पोलिसांना कायदा हातात घेऊन कारवाई करता येणार नाही, असे मत व्यक्त करून कळमना पोलिसांना कडक शब्दांत फटकारले. करीम पटेल व रज्जाक पटेल अशी भंगार व्यावसायिकांची नावे असून ते सख्खे भाऊ होत. त्यांचे कळमन्यातील चिखली ले-आऊट येथे गोदाम आहे. कळमना पोलिसांनी २७ मार्च २०१५ रोजी गोदामावर धाड टाकली. गोदामात सनफ्लॅग व इतर कंपन्यांचे वेगवेगळ्या लांबीचे व एकूण ११ टन वजनाचे स्टील बार आढळून आले होते. या स्टील बारची किंमत पाच लाख रुपये आखण्यात आली होती. यानंतर पटेल बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ४१४, ४६८, ४७१, ३४ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १२४ अन्वये एफआयआर दाखल केला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी पटेल बंधूंनी उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अर्जावर अंतिम सुनावणी करताना न्यायालयाला कळमना पोलिसांनी या प्रकरणात कायदा हातात घेऊन कारवाई केल्याची बाब आढळून आली. यामुळे न्यायालयाने कळमना पोलिसांची कानउघाडणी केली. गोदामात चोरीचा माल ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे धाड टाकल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झालेले नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे, याची माहिती घेण्यासाठी पोलीस उपायुक्त (झोन-५) अभिनाशकुमार यांना न्यायालयात बोलावण्यात आले होते. परंतु अभिनाशकुमार शहरात हजर नव्हते. त्यामुळे प्रकरणावर ३ आॅगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर व अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)