शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

लग्नाऐवजी पोलिसांची बेडी

By admin | Updated: April 9, 2017 02:13 IST

लग्न पक्के झाल्यामुळे भावी पत्नीसोबत लग्नापूर्वीच शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध ....

तरुणावर बलात्काराचा आरोप : आई आणि मामावरही हुंड्याचा आरोप नागपूर : लग्न पक्के झाल्यामुळे भावी पत्नीसोबत लग्नापूर्वीच शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एक लाखाच्या हुंड्यासाठी लग्न मोडले म्हणून तरुणाच्या आई आणि मामावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लग्नबेडीऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकलेल्या या आरोपीचे नाव अनिकेत अशोक कांबळे (वय ३०) आहे. तो मानेवाड्यातील चिंतामणीनगरात राहतो. एका शाळेत काम करणाऱ्या अनिकेतचा लग्न जुळविणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जरीपटक्यातील फिर्यादी तरुणीसोबत (वय २५) संपर्क आला. तरुणीची घरची स्थिती गरिबीची आहे. त्यांची सगाई झाली. दोन्ही पक्षाकडून १७ एप्रिलला लग्न करण्यावर एकमत झाले. दरम्यान, २८ फेब्रुवारीला रात्री अनितकेत तरुणीच्या घरी पोहचला. त्यांच्यात त्यावेळी शारीरिक संबंध आले. त्यानंतर २ एप्रिलला मध्यरात्री पुन्हा अनिकेतने तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यामुळे तिच्या गालावर थापड मारून लग्न मोडण्याची धमकी दिली. दरम्यान, १७ एप्रिलला लग्नाची दोन्हीकडून तयारी सुरू होती. शुक्रवारी अचानक तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. अनिकेतने दोनवेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि आता लग्नास नकार देतो, असे तक्रारीत नमूद केले. त्याचप्रमाणे त्याची आई आणि मामा या दोघांनी आपल्या नातेवाईकांना घरी बोलवून एक लाखाच्या हुंड्याची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी लग्नास नकार दिला, असेही तक्रारीत नमूद केले. त्यावरून जरीपटक्याचे सहायक पोलीस निरीक्षक आय. एस. हनवते यांनी अनिकेतविरुद्ध बलात्कार तसेच त्याच्या आई आणि मामाविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गैरसमज अन् वाद ! पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा सर्व वाद गैरसमजातून निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. अनिकेतच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा औषधोपचार सुरू आहे. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च वाढल्यामुळे आपण विवाह समारंभ काही दिवस पुढे ढकलू, अशी भूमिका अनिकेतच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यातून वादाला सुरुवात झाली. लग्नासाठी ते टाळाटाळ करीत आहेत, असा गैरसमज झाल्यामुळे तरुणीने तक्रार नोंदवली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचे जरीपटका पोलीस सांगत आहेत.(प्रतिनिधी)