शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस दबावाखाली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात जे काही आरोप होत आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. या प्रकरणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात जे काही आरोप होत आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. या प्रकरणात चौकशी होईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईलच. त्यामुळे तोपर्यंत यासंदर्भात कुठल्याही नेत्यावर दोषारोप करणे योग्य नाही. मात्र, पोलीस त्यांचे काम नियमानुसार करतील. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे जनतेला कळून आले आहे. मुख्य म्हणजे भाजपाला देश चालविता येत नाही. त्यांच्या सरकारचे निर्णय देशहितासाठी घातक आहेत, असा आरोप थोरात यांनी केला. महाविकास आघाडीतील मंत्री एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. दर मंगळवारी तिन्ही पक्षांचे मंत्री अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेत असतात. सर्व निर्णय जनतेच्या हितासाठीच असतात. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षात सोनिया गांधी जे निर्णय घेतात, ते सर्वांना मान्य असतात. राहुल गांधी उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. महाविकास आघाडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

भाजपा परत कधीच सत्तेत येणार नाही

आरशात पहा, पुढच्या विरोधी पक्षाचा नेता दिसेल, असे मी कोल्हापूरच्या सभेत म्हणालो होतो. मी पुन्हा येईन, हे तर दूरच, राज्यात भाजपा सत्तेत कधीही येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.