शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:43 IST

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११३०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

ठळक मुद्देगोकुलनाथ शेट्टी, मनोज खरात यांनी दिले आठ एलओयू

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११३०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. नीरव मोदीसह त्याचा भाऊ निशाल मोदी, पत्नी अमी मोदी, गीतांजली जेम्सचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक व नीरव मोदीचे मामा मेहूल चोक्सी, पंजाब नॅशनल बँकेचे माजी उप व्यवस्थापक गोकूलनाथ शेट्टी, मनोज खरात व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सध्या तपास सुरू आहे. पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी वगळता इतर सर्व आरोपी विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. तसे असले तरी हा घोटाळा नेमका कसा झाला, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घोटाळा नेमका कसा झाला?सकृतदर्शनी हा घोटाळा नीरव मोदी याने व्यवस्थित कारस्थान रचून केल्याचे दिसते. यासाठी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचेही दिसते. या अधिकाऱ्यांकडून मोदीने लेटर आॅफ अंडरस्टँडिंग घेतले व त्यामार्फत विदेशातील बेनामी कंपन्यांना ११४०० कोटी रुपये विदेशी चलनात पाठविले.

एलओयू/एलसी काय आहे?विदेशातून माल आयात करण्यासाठी मोठ्या कंपन्या एलओयू किंवा लेटर आॅफ क्रेडिट (एलसी)चा वापर करतात. बँकेने त्या ग्राहक कंपनीची घेतलेली ती एक प्रकारची हमी (गॅरंटी) असते. ही एलसी किंवा एलओयू विदेशातील कंपनीने तेथील बँकेला दाखवल्यास भारतातील बँक त्या बँकेला विदेशी चलनात रक्कम पाठवते व नंतर भारतातील ग्राहक कंपनीकडून व्याजासह वसूल करते. हा व्यवहार विशिष्ट कालावधीत (साधारणत: तीन महिने) पूर्ण करायचा असतो.

बेनामी कंपन्यायासाठी नीरव मोदी आणि कंपूने तीन बेनामी कंपन्याचा दुरुपयोग केल्याचे सध्यातरी दिसते. डायमंड आर यूएस, सोलर एक्सपोर्टस् व स्टेलर डायमंडस् अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यामार्फत ११४०० कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेने विदेशात पाठवले आहेत. मात्र हे सर्व व्यवहार बँकांच्या देशांतर्गत सीबीएस प्रणालीने न होता आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या स्विफ्ट या मेसेज प्रणालीमार्फत झाले. यामुळेच त्यांची पंजाब नॅशनल बँकेत कुठेही नोंद नाही. यावरून बँक अधिकाऱ्यांचा सहभाग सिद्ध होतो.

भारतातील सहा बँकांनाही बसणार फटकाआपल्या बेनामी कंपन्यांची विदेशात खाती उघडण्यासाठी नीरव मोदीने स्टेट बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया व अ‍ॅक्सिस बँकेच्या विदेशातील शाखांचा दुरुपयोग केल्याचे दिसते. या बँकांची चौकशी वित्त मंत्रालय सध्या करीत आहे.

ज्वेलरी कंपन्यांच्या समभागांना मोठा फटकामुंबई : घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेअर बाजारात ज्वेलरी क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसला. गीतांजली जेम्सचे समभाग १९.९७ टक्क्यांनी घसरले. पी.सी. ज्वेलर्स, त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी, राजेश एक्स्पोर्टस् यांचे समभागही घसरले.

दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करणारपीएनबीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांचे स्पष्टीकरण. नीरव मोदी प्रकरणातील ११,४००कोटी रुपयांच्या घोटाळ्यात. दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या घोटाळ्याची सुरुवात २०११ मध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये? नीरव मोदी हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच कुटुंबासह देश सोडून गेला असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीएनबीने २८० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात २९ जानेवारी रोजी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्याचा भाऊ निशाल बेल्जियमचा नागरिक असल्याचेही सांगितले.

नीरव मोदी सरकारी शिष्टमंडळात नव्हतानीरव मोदी स्वित्झर्लंडमधील डावोस येथे पंतप्रधानांसोबत गेलेल्या अधिकृत सरकारी शिष्टमंडळात नव्हता तर मोदी ‘सीआयआय’च्या शिष्टमंडळात होता, असा खुलासा केंद्रीय माहितीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी केला. नीरव मोदी याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे, विमानतळांवर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.नीरव मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांचा गैरफायदा घेत बँकेला फसविले अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. त्यांनी व्टिट केले आहे की, ‘नीरव मोदीकडून भारताला लुटण्याचे मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतली. त्यांच्यासोबत दावोसमध्येही दिसले होते.प्रियंका चोप्राची तक्रारअभिनेत्री प्रियंका चोप्रा ही मोदीच्या ज्वेलरी ब्रँडची ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. एका जाहिरातीची रक्कम न दिल्याप्रकरणी तिने नीरव मोदीविरुद्ध तक्रार दिलेली आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा