शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी उद्या नागपूरमध्ये

By admin | Updated: April 13, 2017 19:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपूरमध्ये येणार आहेत. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने सकाळी 10.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपूरमध्ये येणार आहेत. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने सकाळी 10.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. विमानतळावर स्वागताचा स्वीकार केल्यानंतर दीक्षाभूमीसाठी ते प्रयाण करतील.

दीक्षाभूमी येथे सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारोहास ते उपस्थित राहतील. तसेच पवित्र दीक्षाभूमी स्तूपास भेट देऊन आदरांजली अर्पण करतील.  त्यानंतर ते कोराडी थर्मल पॉवर स्टेशनकडे रवाना होतील. सकाळी 11.45 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटन समारोहाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.25 वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. यावेळी डिजीधन मेळावाचा समारोप होईल.  याशिवाय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ हे विशेष टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येईल. तसेच पंतप्रधान उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून विमानतळाकडे प्रयाण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दुपारी 2.10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी प्रयाण करतील.