शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा कट व तयारी आधीपासूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:17 IST

बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची निर्घृण हत्या करणारा आरोपी सूरज विशेषराव कोटनाके (वय २४) हा अत्यंत क्रूर आणि खुनशी स्वभावाचा आहे.

ठळक मुद्देआयुष पुगलिया हत्याकांड : आरोपी कोटनाके वेगळ्या कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची निर्घृण हत्या करणारा आरोपी सूरज विशेषराव कोटनाके (वय २४) हा अत्यंत क्रूर आणि खुनशी स्वभावाचा आहे. त्याने हत्येचा कट आणि तयारी आधीपासूनच करून ठेवल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे दडपणात आलेल्या कारागृह प्रशासनाने आता आतमधील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे. हत्या करणाºया सूरज कोटनाके याला वेगळ्या स्वतंत्र कोठडीत डांबले आहे.गेल्या दोन वर्षांपासून येथील मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला आरोपी कोटनाके आणि कुश कटारियाचे अपहरण करून हत्या करणारा आयुष पुगलिया हे दोघे एकाच बराकीत (छोटी गोल) राहत होते. कारागृह सूत्रांनुसार हे दोघे आधी एकाच हंडीत जेवायचे. दोघेही तापट वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो वाढतच गेला आणि अखेर ११ सप्टेंबर, सोमवारी सकाळी ७ वाजता सूरज कोटनाकेने पुगलियाच्या डोक्यात फरशी घालून कटनीने त्याचा गळा कापला. त्यानंतर आरोपीने ही कटनी धुवून काढली. ती बाजुच्या झुडूपात लपवून ठेवली आणि स्वत:च पुगलियाका गेम बजाया, असे म्हणत कारागृह रक्षकांना माहिती दिली. त्यानंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाने फोनवरून पोलिसांना कळविले.पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयांकडून पंचनामा करवून घेतला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह मात्र, मेडिकलमध्ये रवाना केला.मंगळवारी सकाळी मेडिकलमध्ये पुगलियाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इकडे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. आता अशी घटना घडणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृह प्रशासनाला दिल्या. आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करीत असून, अनेक कैद्यांनाही विचारपूस करण्यात आल्याचे देसाई यांनी लोकमतला सांगितले.गृहसचिवांना पत्रदरम्यान, आरोपी कोटनाकेला अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी गृहविभागाच्या सचिवांना पत्र लिहून त्याच्या अटकेची परवानगी मागितलीआहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच त्याला पोलीस अटक करू शकतील.