शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीची माहिती द्या

By admin | Updated: January 25, 2017 02:44 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना शिष्यवृत्ती घोटाळ्याची माहिती सादर करण्याचा आदेश दिला.

हायकोर्टाचा आदेश : गृह सचिवांना मागितले प्रतिज्ञापत्र नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना शिष्यवृत्ती घोटाळ्याची माहिती सादर करण्याचा आदेश दिला. त्यासाठी सचिवांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. शिष्यवृत्ती घोटाळ्याची अवैधपणे चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप करून काही शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील फिरदोस मिर्झा यांनी घोटाळ्याची पोलिसांमार्फत चौकशी करण्याला विरोध केला. न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विकास विभागाचे अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा अंतरिम आदेश दिला होता. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करून शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठविण्यात येत आहेत. शासनाने स्थापन केलेली टास्क फोर्स अवैधपणे कार्य करीत आहे असे अ‍ॅड. मिर्झा यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना शिष्यवृत्ती घोटाळ्याची माहिती सादर करण्याचा आदेश दिला. या माहितीमध्ये टास्क फोर्स १५ जानेवारी २०१६ रोजीच्या जीआर अनुसार कार्य करीत आहे काय, १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या अंतरिम आदेशाचे काटेकोर पालन केले जात आहे काय आणि चौकशीकरिता पोलिसांचा वापर केला जात आहे काय या तीन प्रश्नांची उत्तरे असावीत असे न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)