शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनच्या जागेसंदर्भातील याचिका फेटाळली

By admin | Updated: June 20, 2015 03:05 IST

अंजुमन हामी-ए-इस्लाम संस्थेने केंद्र शासनाच्या अख्त्यारितील राजभवनच्या ३.९६ एकर जमिनीवरील अधिकारासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका ...

हायकोर्ट : अंजुमन हामी-ए-इस्लाम संस्थेला दणकानागपूर : अंजुमन हामी-ए-इस्लाम संस्थेने केंद्र शासनाच्या अख्त्यारितील राजभवनच्या ३.९६ एकर जमिनीवरील अधिकारासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला.१९५३ मध्ये तत्कालीन मुख्य आयुक्तांनी राजभवनाच्या पायथ्याशी असलेली २.५८ एकर जमीन संस्थेला वापरासाठी दिली होती. त्यानंतर संस्थेने पुन्हा १.३८ एकर जमीन मागितली होती. अशाप्रकारे संस्था आतापर्यंत राजभवनची ३.९६ एकर जमीन वापरत होती. या जमिनीवर आता राज्य शासनातर्फे दोन हजार आसनक्षमतेचे वसंतराव नाईक स्मृती सभागृह बांधण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. याविरुद्ध संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.राज्य शासनाने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राजभवनाचा परिसर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत येतो. राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय राजभवनच्या जागेचा कोणालाही वापर करता येत नाही. संस्थेला वादग्रस्त जमिनीचा मालकी हक्क देण्यात आलेला नव्हता. या जमिनीसंदर्भात संस्था व शासनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. याप्रकरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. (प्रतिनिधी)