शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 03:21 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात जातीय भेदभाव अडथळा ठरत आहे.

मालेगाव तालुक्यातील वादग्रस्त गाव : तहसीलदारांनी बैठक घ्यावीनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात जातीय भेदभाव अडथळा ठरत आहे. मालेगाव तालुक्यातील (जि. वाशीम) पांगरी नवघरे या गावातील हे प्रकरण आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे.रामदास वानखेडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पांगरी नवघरे गावातील लोकसंख्या ३८०० असून, यापैकी केवळ ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीतील आहे. या गावात बाबासाहेबांच्या जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच विरोध होतो. २००७ मध्ये यावरून मोठा वाद झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. तेव्हापासून गावात कोणत्याही धर्माच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. यंदा बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. यानिमित्त देशभर कार्यक्रम होत आहेत. गावात १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन हा अर्ज नामंजूर करण्यात आला. यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, मालेगाव तहसीलदारांना गावकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे व मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्याचे निर्देश दिले. या निर्देशाचे पालन करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)