शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: May 30, 2014 01:05 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात इव्हीएम यंत्र ठेवण्यात आले होते. इव्हीएमची सुरक्षा लक्षात घेता तेथे इतर व्यक्तींना प्रवेश बंदी होती. हे गोदाम एका व्यापार्‍याने

पोलीस ‘से’ दाखल करणार : नेमाणी गोदामात प्रवेश बंद केल्याचे प्रकरणप्रसन्न दुचक्के  - अमरावतीलोकसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात इव्हीएम यंत्र ठेवण्यात  आले होते. इव्हीएमची सुरक्षा लक्षात घेता तेथे इतर व्यक्तींना प्रवेश बंदी होती. हे गोदाम एका  व्यापार्‍याने भाड्याने घेतले होते. तेथे त्याने सोयाबीन साठवून ठेवले होते. परंतु  त्यालाही पोलिसांनी  तेथे प्रवेश बंदी घातली. यामध्ये त्याचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा आरोप करीत  जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर  खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. ललित समुद्रकर असे याचिकाकर्त्या व्यापार्‍याचे  नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, समुद्रकर यांची मार्क अँग्री जेनेटीक प्रा. लि. कंपनी आहे.  त्यांनी  सोयाबीन व  इतर धान्य साठवून ठेवण्यासाठी बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदाम ८0 हजार रुपये प्रति महिना  भाड्याने घेतले. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर इव्हीएम यंत्र या नेमाणी  गोदामामध्ये ठेवण्यात येणार असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मतदानाच्या काही  दिवसांपूर्वीच गोडावूनचा ताबा  घेतला होता. तेथे कुणालाही  प्रवेश बंद होता. तेथील एका  गोडावूनमध्ये समुद्रकर यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते. सोयाबीनची साफसफाई करणे  आवश्यक असल्याने समुद्रकर यांनी गोडावूनमध्ये प्रवेश करुन बाहेर येण्यासाठी पोलिसांना प्रवेश  पास मागितली होती. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने इव्हीएम यंत्रांना कुठलाही धोका पोहचू नये यासाठी  पोलिसांनी त्यांना पास देण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना सोयाबीन तात्पुरत्या स्वरुपात दुसर्‍या  ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. यामध्ये मजुरांसह समुद्रकर यांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान  झाले. त्यामुळे त्यांनी  नुकसान भरपाई व नेमाणी गोडावुनमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मुंबई उच्च  न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ७ मे २0१४ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महाराष्ट्र  शासनाच्या विरोधात  फौजदारी याचिका दाखल केलीे. याप्रकरणी पोलीस लवकरच ‘से’ दाखल करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.