शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील माणकापूर क्रीडा संकुलात खेळाडूंचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 11:44 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या.

ठळक मुद्देमानकापूर क्रीडा संकुलात कोंडवाडा पिण्याचे पाणी, इतर सोयींचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. संकुलातील एसी बंद ठेवण्यात आल्याने खेळाडूंचा श्वास गुदमरतो आहे. पिण्याचे पाणी आणि शौचालयाचा अभाव असल्याने खेळाडूंची हेळसांड झाल्याची तक्रार सिव्हील राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात केली.पोलीस तक्रारीत ते म्हणाले,‘ कराटे स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत महिनाभराआधी ‘आॅन लाईन‘अर्ज केला. १४, १७ आणि १९ अशा वजन गटातील कराटे स्पर्धकांची माहिती जिला क्रीडा अधिकारी आणि आयोजकांना एक महिन्यापूर्वी होती. १८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता सर्व खेळाडूंना मानकापूर संकुलात वजन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. स्पर्धास्थळी वजन करण्यासाठी ना योग्य यंत्रे होती, ना पुरेसा स्टाफ. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तशी व्यवस्था करण्यात आली.जेव्हा आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली, तेव्हा संबंधित खेळाडूंना कराटे खेळण्याची तारीख कळविणे गरजेचे होते. परंतु १८ सप्टेंबरला वजन केल्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता बोलाविण्यात आले. परंतु ११ वाजले तरी स्पर्धा सुरू झाली नव्हती. ११.३० वाजता १४ वर्षे वयोगटात खेळाडूंची स्पर्धा सुरु झाली.दुपारी २ वाजता, १७ आणि १९ वर्षे वयोगटासाठी उद्या दि. २० रोजी स्पर्धेचे आयोजन होईल, असे जाहीर करताच अनेक खेळाडू आणि पालकांना मनस्ताप झाला.आयोजन प्रमुख असलेले डीएसओ कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अरुण बुटे यांची मनमानी आणि अनियंत्रित कामामुळे शाळेचा अभ्यास बुडाला. बुटे यांच्याविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे जीवने यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची त्यांनी तयारी केली आहे.बुटे हे कुणाशीही उर्मट भाषेत बोलतात, असे काही अन्य पालकांनी लोकमतला फोन करुन सांगितले. स्पर्धा आयोजनात सहकार्य करणारे कराटे कोच झाकिर खान यांचीही वागणूक खेळाडूंसाठी अपमानास्पद अशी होती, असे जीवन यांचे म्हणणे आहे. या संदर्भात झाकीर खान यांना विचारणा केली असता आपण केवळ स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आलो होतो. कुणाशीही हुज्जत घातली नाही. १८०० खेळाडू एकाचवेळी येतील याचा अंदाज नसल्याने थोडी तारांबळ उडाल्याचे ते म्हणाले. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी आपल्याकडे कुणीही तक्रार घेऊन आले नाही. असे काही घडले असेल तर उद्या सर्व माहिती घेऊ, असे सांगितले. क्रीडा संकुलातील अधिकाºयांकडे एसी सुरू करण्याची विनंती केली असता त्यांनी वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका