शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदी : राज्यातील ३० हजार कोटींचे उद्योग बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:48 IST

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर जवळपास २५ ते ३० टक्के अर्थात वार्षिक ३० हजार कोटी उलाढालीच्या उद्योगांवर कुऱ्हाड कोसळली आहे.

ठळक मुद्दे२२ जूनला हायकोर्टात सुनावणी

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर जवळपास २५ ते ३० टक्के अर्थात वार्षिक ३० हजार कोटी उलाढालीच्या उद्योगांवर कुऱ्हाड कोसळली आहे. बंदी टाकलेल्या वस्तूंचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे बेरोजगारी लाखाच्या संख्येत वाढली आहे. पण याप्रकरणी २२ जून रोजी हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच बंदीची रूषरेषा स्पष्ट होणार आहे.

लहान उद्योगांसमोर बँकांचे हप्ते फेडण्याचे संकटबँकेच्या आर्थिक पुरवठ्यावर लहान उद्योग सुरू होतात. पण बंदीमुळे सुरू असलेले उद्योग बंद झाले आहेत. त्यांच्यासमोर बँकेच्या थकीत कर्जाचे हप्ते फेडण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. थकीत कर्जामुळे बँकांनाही फटका बसणार आहे. बरेच उद्योग दोन लाख ते दोन कोटींपर्यंतच्या गुंतवणुकीचे आहेत. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघु उद्योग विभागात मोडणारा व्यवसाय आहे. प्लास्टिक बॅग निर्मितीत महाराष्ट्रातील प्रकल्प व उपकरणांमध्ये जवळपास चार हजार कोटींची गुंतवणूक आहे. १० हजार कोटींपेक्षा जास्त पैसा बँकांमध्ये अडकला आहे. सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयावर २२ जूनला हायकोर्टात निर्णय होणार आहे. महाराष्ट्र प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनने सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. मंत्रालयातील अधिकाºयांच्या सही, शिक्क्यासह कोणताही कागद अजूनही संबंधित विभागाकडे आलेला नाही. अधिकाऱ्यांसह उद्योजकही संभ्रमात आहेत. बंदीच्या सर्व बाजू न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.बेरोजगारीचे संकट, शासनाच्या महसुलावर परिणामविदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत धोंडरीकर म्हणाले, राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त प्लास्टिक उद्योग आहेत. त्यापैकी विदर्भात एक हजार आणि मराठवाड्यात १५००, कोकणात एक हजार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे सर्वाधिक कारखाने आहेत. याशिवाय प्लास्टिक गृहउद्योग लाखाच्या घरात आहे. अशा स्थितीत सरकारने बंदी टाकून काय साधले, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, देशात एकीकडे स्कील इंडिया, मेक इन इंडिया, यासारख्या विविध उपक्रमांतून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन उद्योजकांना आणि या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना संकटात टाकले आहे. बंदीमुळे सरकारला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.या वस्तूंच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी नाहीदूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी