शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:56 IST

प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर सर्व सरकारी कार्यालयांना आदेश आहेत. मात्र डोळ्यादेखत सुरू असलेल्या या विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बंदीलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकारवाईचे अधिकार असलेल्या मनपासह सर्वांचेच दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर सर्व सरकारी कार्यालयांना आदेश आहेत. मात्र डोळ्यादेखत सुरू असलेल्या या विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बंदीलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे.मकरसंक्रांत २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे बच्चेकंपनीसोबतच मोठ्यांमध्ये पतंगबाजीचे वारे वाहू लागले आहे. यातच नाताळाच्या सुट्या लागल्याने गच्चींवर ओ काट... ढिल दे रे... चकरी पकड...कटली रे पतंग... अशी आरडाओरड वाढली आहे. चौका-चौकामध्येही पंतग व मांजाची दुकाने सजू लागली आहेत. दुकानांमध्ये विविध रंगात व आकारात असलेल्या पंतगी लक्ष वेधून घेत आहेत. विशेषत: पॉलिथीनच्या पतंगीवर हवे ते छापणे शक्य आहे. यामुळे लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला छोटा भीम, डोरेमॉन ते ‘रोबोट-२’ चित्रपटाचे पोस्टर असलेल्या पतंगी आल्या आहेत. पॉलिथीनच्या पतंगी या कागदी पतंगाच्या तुलनेत स्वस्त व लवकर फाटत नाही. हातोहात विक्रीही होत असल्याने मोठा साठा बाजारात उपलब्ध झाला आहे. परंतु पॉलिथीनच्या या विक्रीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांपासून ते कारवाईचे अधिकार असलेल्या विविध विभागींचे दुर्लक्ष झाले आहे. मार्च २०१८ पासून राज्य सरकारने प्लास्टिक उत्पादन, त्यांचा वापर, विक्री आणि वाहतुकीवर बंदी आणली आहे. परंतु ही बंदी नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकची धडाक्यात विक्रीमोठ्या दुकानांपासून ते आता भाजी, फूल, मटन, मासे, चिकन विक्रेत्याकडून बंदी असलेल्या ५० मायक्रॉन कॅरीबॅग्जचा सर्रास वापर करत आहेत. हॉटेलमध्ये अन्नपदार्थांच्या पार्सलसाठी प्लास्टिक बॅग्जचा वापर होत आहेत. आता यात पॉलिथीनच्या पतंगांची भर पडल्याने, बंदी कुठे आहे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.प्लास्टिक बॅग्जपासून होणारे पर्यावरणाचे नुकसान आज सर्वांनाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅगच्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजारेक वर्ष लागतात. एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. याउलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदीनाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. काही प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. पॉलिथिन पतंगाची जाडीही एवढ्याच मायक्रॉनची राहत असल्याने चिंतेचे कारण ठरले आहे. यावर कारवाई होणे आवश्यक आहे.कौस्तुभ चॅटर्जीसंस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkiteपतंग