शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निर्बंधानंतरही प्लास्टिकवर नियंत्रण येईना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 11:28 IST

Nagpur News नागपूर शहराचा विचार केल्यास, आजही घरातून, औद्याेगिक तसेच शासकीय व खासगी संस्थांमधून निघणाऱ्या कचऱ्यामध्ये जैविक कचऱ्यानंतर प्लास्टिकच दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या क्रमांकावर १६ टक्के कचरा प्लास्टिकचा 

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अमर्याद वापरामुळे भरमसाठ वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चार वर्षांपूर्वी त्यावर निर्बंध घातले. मात्र, अंमलबजावणीबाबत याेग्य नियाेजन नसल्याने हवे तसे यश मिळताना दिसत नाही. नागपूर शहराचा विचार केल्यास, आजही घरातून, औद्याेगिक तसेच शासकीय व खासगी संस्थांमधून निघणाऱ्या कचऱ्यामध्ये जैविक कचऱ्यानंतर प्लास्टिकच दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरात दरराेज गाेळा हाेणाऱ्या कचऱ्यामध्ये सरासरी ६० टक्के जैविक, यानंतर १६ टक्के प्लास्टिक कचऱ्याचा समावेश आहे.

वैश्विक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाने धाेक्याची मर्यादा केव्हाच ओलांडली आणि आता हा विळखा अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी कठाेर पावले उचलण्यासाठी जगभरातून प्रयत्न हाेत आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर प्रतिबंध लावल्यानंतर जागृत नागरिकांनी त्याचा वापर बंद केला, पण मायक्राॅनच्या फरकाचा आधार घेऊन सर्रास वापर हाेत आहे. अनेक खाद्यपदार्थ विक्रेता संस्थांमध्ये पेपर बॅगचा उपयाेग हाेणे ही समाधानाची गाेष्ट आहे. मात्र, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी प्लास्टिकचाच वापर हाेत आहे, तर विविध क्षेत्रांतील प्लास्टिक बाॅटलचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे वस्त्यापासून समुद्राच्या टाेकापर्यंत आणि हिमालयासारखे उंच पर्वतही प्लास्टिक प्रदूषणाने व्यापले आहेत.

नागपूर शहरातून दरराेज १२०० टनांवर कचरा गाेळा केला जाताे. म्हणजे प्रतिव्यक्ती दरराेज सरासरी ४४४ ग्रॅम कचरा बाहेर टाकताे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) ने सर्व झाेनच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधून केलेल्या सर्वेक्षणात प्लास्टिक कचऱ्याचाच समावेश अधिक असल्याचे नमूद केले आहे. सर्वाधिक प्लास्टिक शासकीय व खासगी संस्थांमधून निघताे, तर निवासी वस्त्यामधून प्रमाण कमी आहे.

- काेराेनामुळे रखडला प्लास्टिक व्यवस्थापनाचा प्लॅन

नीरीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेने प्लास्टिक प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी एक प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन ‘युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंट प्राेग्राम’मध्ये स्वीकारण्यात आला आहे. यावर्षी जानेवारीपासून हा कार्यक्रम राबविण्यात येणार हाेता. मात्र, काेराेनामुळेच ही याेजना कार्यान्वित हाेऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. परिस्थिती सुधारल्यास हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी