शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; निवडणूक प्रचारालाही प्लास्टिकबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:44 IST

प्लास्टिकबंदीचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत दिसताहेत कागदी बिल्ले कागदी साहित्य महाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली आहे. त्याचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.ठोक विक्रेत्यांनी सांगितले की, विदर्भात प्लास्टिक प्रचार साहित्यांची जवळपास १५०० कोटींची उलाढाल आहे. केंद्र सरकारने भारत सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने निर्णय घेतल्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्लास्टिकचे प्रचार साहित्य हद्दपार झाले असून, त्याऐवजी कागदी आणि कापडी प्रचार साहित्य बाजारात आले आहेत. विक्रेते म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी प्रचार साहित्यांची जुळवाजुळव सहा महिन्यांपूर्वीपासून करावी लागते. उमेदवारांनी खरेदी न केल्यामुळे व्यावसायिकांजवळ प्लास्टिकचे प्रचार साहित्य पडून आहेत. निवडणूक आयोगानेही या साहित्यावर बंदी टाकली आहे. आयोगाने तसे पत्र प्रचार साहित्य तयार करणाऱ्यांना आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्वच पक्षांना पाठविले आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.सध्या उत्पादकांकडे आणि बाजारात कागदी बिल्ले उपलब्ध आहेत. शिवाय उमेदवारांचे फोटो लावलेले कागदी पोस्टर्स तयार करून मिळत आहेत. बाजारात कुठेच प्लास्टिकचे प्रचार साहित्य उपलब्ध नाही. विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ तारखेला होणार आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराची लगबग सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजूनही प्रचार साहित्य व्यावसायिकांमध्ये त्याची पूर्तता करण्यासाठी धडपड सुरू आहे.नागपुरात विविध पक्षांचे प्रचार साहित्य मुंबई आणि दिल्लीहून येते. नागपुरात प्रचार साहित्यांची विक्री करणारे ५० पेक्षा जास्त ठोक आणि चिल्लर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे अनेकांनी प्रचार साहित्यांची पूर्वनोंदणी करून आगाऊ रक्कम दिली आहे.पर्याय म्हणून आता उत्पादक पुन्हा कागदी प्रचार साहित्यांकडे वळले आहेत. विशेष म्हणजे खिशाला लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक बिल्ल्यांऐवजी इतिहासात जमा झालेले कागदी बिल्ले आता परत निवडणुकांमध्ये दिसत आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019