शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाबाधितावर मंगळवारी प्लाझ्मा थेरपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:48 IST

सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य भारतातील पहिले प्लाझ्मा थेरपी ट्रायल ठरेल.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये दोन दात्यांनी दिला प्लाझ्मा : प्लॅटिना प्रकल्पाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’वर जगात कोणतेही अँटिव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थितीत रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य भारतातील पहिले प्लाझ्मा थेरपी ट्रायल ठरेल.गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारातील सर्वात मोठा प्रकल्प प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायलचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, औषधे व सांस्कृतिक कार्यमंत्री राजेंद्र पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. टी. पी. लहाने यांच्यासह नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता व या प्रकल्पाच्या अंमलबजावणी पथकाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर अ‍ॅण्ड ट्रायल को-आॅर्डिनेटर महाराष्ट्र स्टेट डॉ. सुशांत मेश्राम, या प्रकल्पाचे इन्चार्ज व स्टेट नोडल अधिकारी डॉ. एम. फैजल, रक्तपेढीचे प्रमुख डॉ.संजय पराते यांच्यासह इतरही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. या प्रकल्पात राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व मुंबईतील बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चार महाविद्यालये असे एकूण २१ केंद्रांवर गंभीर लक्षणे असलेल्या ५०० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल सुरू होणार आहे. सर्व गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जातील. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरूद्ध अँटिबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरूद्ध प्लाज्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. आज उद्घाटनदरम्यान शासनाने उपलब्ध करून दिलेल्या प्लाझ्मा फेरेसीस मशीनच्या मदतीने दोन दात्यांकडून प्लाझ्मा घेण्यात आला. या पूर्वी एका दात्याकडून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, आज उपलब्ध झालेल्या ‘ए’ पॉझिटिव्ह दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका गंभीर रुग्णाला देण्याची शक्यता आहे. चाचणीनंतरच प्लाझ्मा दिला जाणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या