शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन चुकले, निकाल लांबले

By admin | Updated: February 25, 2017 02:12 IST

ईव्हीएम मशीन असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागतील.

काही ठिकाणी पोलिसांचा आगाऊपणा : पत्रकारांनाच रोखले नागपूर : ईव्हीएम मशीन असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागतील. परंतु प्रशासनाचे नियोजन चुकले. निकालासाठी सायंकाळ झाली. काही ठिकाणी तर निकालासाठी रात्री ९ वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. इतकेच नव्हे तर काही झोनमधील मतमोजणी केंद्रावर जाण्यापासून पत्रकारांनाच पोलिसांनी रोखले. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश असल्याचा आगाऊपणादेखील काही पोलिसांनी केला. त्यामुळे गोंधळ उडाला. एकूणच निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन सपशेल चुकल्याचे दिसून आले आहे. सतरंजीपुरामध्ये ‘एसीपी’ रिना जनबंधूची पत्रकारांशी उद्धट वागणूक सतरंजीपुरा झोनची मतमोजणी सतरंजीपुरा झोनच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात आली. या केंद्रावर रात्री पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. लाठीहल्ल्याची माहिती मिळताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित पत्रकार केंद्राबाहेर धावले. त्यांनी लाठीहल्ल्याचे चित्रीकरण कॅमेरा आणि मोबाईलमध्ये सुरू केले. लाठीहल्ला कॅमेऱ्यात बंद करीत असल्याचे पाहून पोलिसांनी पत्रकारांना मारहाण सुरू केली. यावेळी लकडगंजच्या सहायक पोलीस आयुक्त रिना जनबंधू यांनी पत्रकारांना तुमची ड्युटी मत मोजणीची आहे, तुम्ही बाहेर कुणाला विचारून आले, अशी विचारणा करून पत्रकारांसोबत दमदाटी सुरू केली. त्या पत्रकारांची दमदाटी करीत असताना त्यांच्या सोबतचे पोलीस पत्रकार आणि छायाचित्रकारांना वाईट शिवीगाळ करीत होते. आम्ही आमची ड्युटी बजावत आहोत, जेथे प्रसंग घडला तेथे आम्हाला जावे लागते, असा पत्रकारांनी रिना जनबंधू यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पत्रकारांचे काहीच न ऐकता त्यांचा कॅमेरा, मोबाईल ताब्यात घेऊन पत्रकारांना उद्धट वागणूक दिली. आसीनगरझोनमध्ये फेरमतमोजणीची मागणी अधिकाऱ्यांनी फेटाळली आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक २, ३ व ६ या प्रभागाची मतमोेजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ठवरे कॉलनी येथे करण्यात आली. रात्री ८.३० वाजेपर्यंत ही मतमोजणी चालली. दरम्यान प्रभाग क्रमांक ३ अ मधून भाजपचे विजय ऊर्फ बंडू पारवे व याच प्रभागातून ड प्रवर्गात अपक्ष सुरेखा तळवेकर या अतिशय कमी मताच्या फरकाने पराभूत झाल्या. याशिवाय प्रभाग ६ ड मधून मुस्लीम लीगचे खान असलम रशीद यांनाही कमी मताने पराभव पत्करावा लागला. यामुळे या तिघांनीही प्रत्येक प्रभागाच्या मतमोजणीच्या वेळी फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे यांनी मात्र या तिघांचीही मागणी फेटाळून लावली. असलम खान व त्यांचे समर्थक तर रात्री उशिरापर्यंत झोन कार्यालयात तळ ठोकून होते. इतर ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी मान्य झाली, तर येथे का नाही, असा त्यांचा प्रश्न होता. परंतु त्यांच्या प्रश्नाचे कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.