शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:50 IST

कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.

 

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.नागपूर जिल्ह्याचे पीक लागवडीलायक क्षेत्र ६ लाख ३३ हजार २१२ हेक्टर आहे. त्यातील सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ४ लाख ७९ हजार २०९ हेक्टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. सरासरी पर्जन्यमान १,०३७ मिमी असून २०१९-२० मध्ये सरासरीपेक्षा ११४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातही पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील खरिपासाठी या हंगामात १ लाख ५ हजार ३०० हेक्टरवर तृणधान्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी ९७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रफळावर भात, गहू, मका, ज्वारी अशा तृणधान्याचे उत्पादन घेण्यात आले होते. तर कडधान्यासाठी ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे. मागील हंगामातही यासाठी एवढेच नियोजन असले तरी ५३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर ते यशस्वी होऊ शकले.यंदाच्या खरिपात कापसाच्या पिकाचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने वाढविण्यात आले आहे. गतवर्षी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनापेक्षा जास्त १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन यंदा हे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.उसाच्या खरिपाचे नियोजन मागील वर्षीएवढेच ३०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. गतवर्षी उसासाठी अधिक क्षेत्रफळ गृहीत धरले असले तरी १ हजार ९०० हेक्टरवरच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली.९२ हजार क्विंटलवर बियाणे लागणारयंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात ९२ हजार ५६४.३० क्विंटल बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. महाबीजच्या ३३ हजार ४१३ बियाण्यांची मागणी होणार असून या बियाण्यांमध्ये यंदा जवळपास ३ हजार क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. खासगी बियाण्यांचे गतवर्षीचे नियोजन ६५ हजारांवरून ५६ हजार १५१.३० क्विंटलवर करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती