शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणीच नाही

By admin | Updated: April 22, 2017 03:01 IST

आमदार निवासाच्या खोलीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीची गुन्हा दाखल होऊन तब्बल चार दिवस झाले

खळबळजनक बाब उघड

नरेश डोंगरे   नागपूर आमदार निवासाच्या खोलीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीची गुन्हा दाखल होऊन तब्बल चार दिवस झाले तरी अद्याप वैद्यकीय तपासणी झाली नसल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. या संदर्भात गिट्टीखदान ठाण्यातून माहिती देण्याचे टाळण्यात आल्याने हे प्रकरण आता आणखीनच गंभीर बनले आहे. बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होताच सर्वप्रथम पीडित महिला किंवा मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली जाते.प्रारंभीपासूनच अनेक शंका निर्माण करणाऱ्या या संवेदनशील प्रकरणात प्रारंभी तर वैद्यकीय तपासणी झालीच नाही. मात्र, १७ एप्रिलला गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि १८ तारखेला पीडित युवती, आरोपी समोरासमोर असतानादेखील पोलिसांनी पीडित युवतीचे मेडिकल करवून घेतले नाही. १९ एप्रिलला पोलिसांनी आरोपी मनोज भगत आणि रजत मद्रे या दोघांना अटक करून त्यांचा पीसीआरही मिळवला. शुक्रवारी त्यांच्या पीसीआरचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी त्यांना कोर्टात हजर करून पोलीस पुन्हा वाढीव पीसीआरची मागणी करणार आहे. गुन्हा दाखल होऊन, आरोपी अटक करून आता ९६ तासांचा कालावधी झाला मात्र पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. या संबंधाने गिट्टीखदान पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती देण्याचे टाळले जाते. एका अधिकाऱ्याने मात्र आॅफ द रेकॉर्ड अनामिक कारणामुळे वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभापासूनच ढिसाळपणा केल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या सदस्य निता ठाकरे यांनी लावला आहे. आपण पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी आज लोकमतशी बोलताना नोंदवली आहे. तसा प्राथमिक अहवालही आपण वरिष्ठांकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) ७२ तासात २० वेळा बलात्कार १४ एप्रिलला सकाळी ७.३० वाजता युवती घरून बाहेर आल्यानंतर आरोपी भगतने पहिल्यांदा तिच्यावर इको स्पोर्ट (एमएच ३१/ ईए ५४०८) कारमध्ये आमदार निवासाच्या परिसरात शरीरसंबंध जोडले. त्यानंतर आरोपी रजत मद्रे पोहचला. त्यानंतर पुढच्या ७२ तासांच्या कालावधीत ३२० क्रमांकाच्या खोलीत दोघांनीही तब्बल २० वेळा युवतीवर बलात्कार केला. घरी नेऊन सोडल्याच्या एका तासानंतर भगतने पुन्हा युवतीच्या मोबाईलवर फोन करून शरीरसुखाची मागणी केल्याचे समजते.