शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची जागा दिवसेंदिवस होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:17 IST

कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम : आजी-माजी विद्यार्थ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेले नागपूर कृषी महाविद्यालय शहराच्या अतिशय मोक्याच्या व मध्यभागी परिसरात आहे. महाविद्यालयाकडे मोक्याच्या ठिकाणी जवळपास ४४६.२१ हेक्टर जमीन होती. यात महाराजबागेचाही समावेश आहे. यापैकी ५९.३९ हेक्टर जमीन ही यापूर्वी वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय संस्थेला हस्तांतरित करण्यात आली. तर बजाजनगर, शंकरनगर, रामदासपेठ यासारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत २९.६९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यामुळे सध्या कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात फक्त ३६०.१३ हेक्टर जमीन आहे.आता महापालिकेने रामदासपेठ येथील व्हीआयपी रोडला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीवर नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक तयार करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी या जमिनीवरील जुने वृक्ष तोडले जाणार आहेत. त्यामुळे येथील आजी-माजी विद्यार्थी संतापले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घणारे ९२० विद्यार्थी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२४ विद्यार्थी आणि कृषी व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे ६० असे एकूण १२०४ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. कृषी महाविद्यालयाच्या मानकानुसार ६० विद्यार्थ्यांसाठी किमान १०० एकर जमिनीची आवश्यकता असते. त्यामुळे जवळपास दोन हजार एकर जागा महाविद्यालयाकडे असायला हवी. सध्या कृषी महाविद्यालयाकडे सध्या ८७७.५० एकरच्या जवळपास जमीन आहे. ती मुळातच कमी आहे. त्यामुळे ही जागा अशीच कमी होत गेली तर भविष्यात महाविद्यालयाची मान्यताच संकटात सापडू शकते.अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवाराचा पुढाकारकृषी महाविद्यालयाची ही जागा वाचविण्यासाठी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवारने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या मोहिमेत आजी-माजी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी होत आहे. याअंतर्गत नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅकच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीcollegeमहाविद्यालय