शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी : स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धेकडे स्पर्धकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:57 IST

ज्यांच्या विनोदी आणि सारगर्भित लेखनाची आजन्म भुरळ पडावी अशा लाडक्या आणि महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न म्हणून गौरविल्या गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ या एकपात्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीकडे नागपुरातील स्पर्धकांनी पाठच फिरवली, असे म्हणावे लागेल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत कसेबसे ११ स्पर्धक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकेवळ ११ कलावंतांनीच घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्यांच्या विनोदी आणि सारगर्भित लेखनाची आजन्म भुरळ पडावी अशा लाडक्या आणि महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न म्हणून गौरविल्या गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ या एकपात्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीकडे नागपुरातील स्पर्धकांनी पाठच फिरवली, असे म्हणावे लागेल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत कसेबसे ११ स्पर्धक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे, अमरावतीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरिला २३ स्पर्धकांनी हजेरी लावली होती. नागपुरात चारच महिन्यापूर्वी ९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन पार पडल्यानंतर, नागपूर-विदर्भातील नाट्यचळवळीला उभारी येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, तसे चित्र अद्यापतरी दिसत नाही. विशेष म्हणजे, या स्पर्धेची प्रसिद्धी शासनामार्फत गेल्या एक महिन्यापासून सर्वस्तरावर करण्यात आली. असे असतानाही, स्पर्धेकडे स्पर्धकांनी फिरवलेली पाठ अनेक शंका उपस्थित करणाऱ्या आहेत.