शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पियरवा मेरी मान ले तू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:17 IST

स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले.

ठळक मुद्देपं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह : पं. वाल्मिक धांडे, कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गायन-वादन रंगले. या कार्यक्रमात या दोन्ही कलावंतांसह दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे नवनियुक्त संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीष गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, स्वरसाधनाचे कार्याध्यक्ष आ. अनिल सोले, संगीततज्ज्ञ बाळासाहेब पुरोहित व पं. जगदीश टेकाडे उपस्थित होते. निवेदन वेदिका पिंपळापुरे यांनी केले. गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे शास्त्रीय गायन श्रोत्यांंच्या काना-मनाचा वेध घेऊन गेले. जन्मत: सुरेल-निकोप स्वरांची देण, लयकारीचे विभ्रम, प्रभावी गमक व मिंड या वैशिष्ट्यांसह गायिकेने राग बिहागचे सादरीकरण केले. विलंबित झपतालातील पिया मोरा मनवा...व द्रुत लयीतील पियरवा मेरी मान ले तू...व तराणा सुरेलतेने सादर केला. संत कबीरदासाच्या प्रसन्न भजनासह रेहना नही देस विराना हैं...या गायनाचे सुखद समापन झाले. गायिकेला तबल्यावर विवेक संगीत, हार्मोनियम-संदीप गुरमुले व तानपुऱ्यावर प्रभा लपालीकर यांनी सहसंगत केली. यानंतर पं. वाल्मिक धांडे यांचे मधूर संतूर वादन रंगले. राग परियाकल्याणसह सादरित हे वादन श्रृतीसुखद होते. रागांची शुद्धता, वादन कुशलता लयकारीवरील पकड या वैशिष्ट्यांसह हे वादन श्रोत्यांना सुखद अनुभव देऊन गेले. राम खडसे यांनी सहतबला संगत केली. पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, छाया वानखेडे व सुप्रिया जोशी यांनी संस्कार भारती गीत व सरस्वती वंदनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मनोज श्रोती, श्रीकांत बंगाले, मुकुंद मुळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिक