शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या रस्त्यावरील खड्डे आणि सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 15:13 IST

आजकाल मीम्स हे सोशल मिडीयाचं एक प्रमुख हत्यार बनलंय. एखाद्या फोटो किंवा व्हिडिओवर साध्या सोप्या आणि सरळ शब्दात थेट संदेश मीम्सच्या माध्यमातून दिला जातो. सध्या नागपूरच्या रस्त्यावरील खड्डयांना मीम्सकऱ्यांनी टार्गेट केले आहे.

ठळक मुद्देनागपूरकरांचे मनोरंजन

नागपूर : नागपुरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यात पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे रुपांतर पाण्याच्या डबक्यासारखे होते. सामान्य नागरिकांना येता-जाता याचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर काही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही. तर, आता याच खड्डयांवरचे मीम्स हे तुफान व्हायरल होत आहेत. 

नागपूर शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे बघितल्यावर त्यांचे जणू ७ जन्मांचे अतुट नाते असल्याची प्रचिती येते. या रस्त्यांची अवस्था किती दयनीय असावी आणि प्रशासनाचे याकडे किती लक्ष आहे, याचाही अंदाजा यावरुन येतो. यातूनच तरुनाईला खड्ड्यांच्या मीम्सची भन्नाट कल्पना सुचलेली दिसते. रस्ते आणि प्रशासनाला मीम्सकरांनी सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. 

पावसासोबत नागपूरच्या रस्त्यांवर मीम्सचाही पाऊस पडतोय. एका मीममध्ये 'जेव्हा तुम्ही पावसात नागपुरच्या रस्त्यावरुन जाता' तेव्हा चंद्रावर असलेल्या खड्ड्यांपेक्षाही जास्त खड्डे या रस्त्यांवर असल्याचे जाणवते, असे लिहीले आहे. अशाच प्रकारे अनेक मीम्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.  हे मीम्स पाहून आतातरी प्रशासनाला जाग येते का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.