शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाच्या धाकावर दरोडा

By admin | Updated: October 25, 2014 02:35 IST

पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एका कंत्राटदाराच्या घरातून सोने आणि रोख रक्कमेसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

नागपूर : पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एका कंत्राटदाराच्या घरातून सोने आणि रोख रक्कमेसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगोरे लेआऊटमध्ये गुरुवारी पहाटे ही दरोड्याची घटना घडली.मॉडेल स्कूल, गजानन मंदिरजवळ ब्रिजेश रूस्तमदास पटेल (वय ३५) यांचे निवासस्थान आहे. ते कोराडीच्या प्रकल्पात मजूर पुरवितात. गुरुवारी पहाटे २.३० वाजता पटेल दाम्पत्य गाढ झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड शोधत असताना झालेल्या आवाजामुळे पटेल दाम्पत्याला जाग आली. त्यांनी उठून बघितले असता सात दरोडेखोर दिसले. बहुतांश जणांच्या तोंडावर स्कार्फ बांधला होता. पटेल दाम्पत्याने आरडाओरड करीत आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी पिस्तूल, चाकू तसेच स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून त्यांना गप्प केले. जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी त्यांना रोख आणि मौल्यवान चीजवस्तूंची मागणी केली. जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्यामुळे पटेल यांच्या पत्नीने घरातील तसेच अंगावरील दागिने आणि रोख ३८ हजार, असा २ लाख, ४२ हजारांचा ऐवज दरोडेखोरांच्या हवाली केला. आहे तेवढे घेऊन जा मात्र आम्हाला दुखापत करू नका, अशी विनवणी करीत पटेल दाम्पत्य एका ठिकाणी बसून राहिले. आणखी घरात काहीच मिळत नसल्याचे पाहून अर्ध्या तासानंतर दरोडेखोर पळून गेले. ते दूर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर पटेल यांनी पोलिसांना माहिती दिली. दरोड्याची घटना घडल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने पटेल यांच्या घरासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली. कोराडीचे ठाणेदार महाले, एपीआय तुमडाम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहचले. दरोडेखोरांनी पटेल यांच्या दारासमोर दोन चपला ठेवल्या होत्या. पोलिसांनी श्वान पथकाला बोलवून दरोडेखोरांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान काही अंतरापर्यंत जाऊन परत फिरला.