शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सीमाच्या पाठीराख्यात पीआयचेही नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडात पाेलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून अटक केलेल्या मृतकाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडात पाेलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून अटक केलेल्या मृतकाची पत्नी सीमा हिचे एका पोलीस अधिकाऱ्याशी मधुर संबंध असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. त्यामुळे हत्याकांडाशी त्याचा काही संबंध आहे का, त्याची ग्रामीण पोलीस चाैकशी करणार आहेत.

पवन चाैधरीने त्याच्या अल्पवयीन साथीदाराला सोबत घेऊन वंजारीनगरातील निवासी प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे यांचे अपहरण करून त्याची हत्या केली. मंगळवारी सकाळी खापा येथे बागडेचा मृतदेह मिळाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी पवन चाैधरी तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली. त्यांच्या चाैकशीतून बागडेच्या पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी बुधवारी दुपारी सीमाला अटक केली. तिचा २८ पर्यंत पीसीआरही मिळवला. दरम्यानच्या तिच्या चाैकशीतून पुन्हा नव्याने खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, नेतागिरीची सवय असलेल्या सीमासोबत एका पोलीस अधिकाऱ्याचे मधुर संबंध होते. या दोघांची सलगी प्रदीपलाच नव्हे तर त्या पोलीस निरीक्षकाच्याही घरी माहिती पडल्याने वादळ उठले. या वादळामुळेच निरीक्षकाची पत्नी मुंबईहून थेट वाठोड्यात पोहोचली होती. तेव्हा तो वाद शमला. परंतु आता सीमाने प्रदीपची हत्या करवून घेतली. त्यामुळे या सुपारी कांडात सीमासोबत त्या पोलीस निरीक्षकाच्या संबंधाची बाब पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. या पार्श्वभूमीवर, त्या निरीक्षकाची काही भूमिका आहे का, त्याची चाैकशी केली जाणार आहे.

---

अजनीत असताना सलगी

काही दिवसांसाठी सदर निरीक्षक अजनी ठाण्यात होते. त्यावेळी सीमाचे त्याच्याशी संबंध आले आणि दोघांमधील सलगी वाढल्याचे बोलले जाते. सध्या हा अधिकारी नागपूर बाहेर बदलून गेला आहे.

----