नागपूर : पायोनियर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्यावतीने २५ व्या वर्धापन दिवसानिमित्त वर्धा रोडवरील चिंचभवन येथे पायोनियर आर्किड हा टू-बीएचके अपार्टमेंटचा प्रकल्प सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाला पश्चिम भारतातील बेस्ट ॲफॉर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट गटामध्ये दि टाइम्स रियल इस्टेट आयकॉन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
पायोनियर ग्रुपने रियल इस्टेट क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण करून ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. जास्तीतजास्त ग्राहकांना पीएमएवायचा लाभ मिळवून दिल्यामुळे या ग्रुपला एचडीएफसी बँकेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. ग्रुपने २५ व्या वर्धापन दिवसानिमित्त ग्राहकांना विशेष सूट देऊ केली आहे. याशिवाय ग्राहकांना विविध अनुदान, स्टॅम्प ड्युटी सवलत, पीएमएवाय लाभ, कर्जावर कमी व्याज दर इत्यादीचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये ग्रीन जीम, ॲम्फिथेटर, कीडस् प्ले एरिया, जॉगर्स ट्रॅक, सिनियर सिटीझन सिट आऊट, टेरेस लॉन, सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय ग्राहकांना होम ऑटोमेशन, वाय-फाय सेवा, होम इंटेरियर परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. ही योजना मिहानला लागून असून नागपूर विमानतळ, शाळा, रुग्णालये इत्यादी अगदी जवळ आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील फ्लॅट्सची विक्री झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील फ्लॅट्सचे काम सुरू आहे. योजनेचे एकूण ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. बुकिंग सुरू आहे. ग्राहकांना ठरलेल्या वेळेत फ्लॅट्सचा ताबा दिला जाणार आहे. आतापर्यंत कंपनीने २० प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्या प्रकल्पांत ३५०० कुटुंबे राहात आहेत.