शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप्‌ची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : भरधाव पिकअप्‌ वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : भरधाव पिकअप्‌ वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा टी-पाॅईंट परिसरात मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

संदीप चंपतराव काेहळे (वय २३, रा. गाैराळा, ता. हिंगणा) असे मृताचे नाव असून, नीतेश ईश्वर उईके (३०, रा. घुबडी, ता. काटाेल) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. नीतेश व संदीप हे दाेघेही एमएच-४०/बीक्यू-२५४० क्रमांकाच्या दुचाकीने काेंढाळीकडून मसाळा गावाकडे जात हाेते. दरम्यान टी-पाॅईंट परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच-२७/बीएक्स-४८६४ क्रमांकाच्या भरधाव पिकअप्‌ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या संदीपच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक नीतेश हा गंभीररित्या जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच काेंढाळीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार पाेलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाेहाेचले. पाेलिसांनी जखमीला काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी आराेपी पिकअप् वाहनचालक सुनील तुकाराम पारवे (२७, रा. खारवा, जि. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास काेंढाळी पाेलीस करीत आहेत.