शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकाने गॅलरीतून काढला सभागृहातील फोटो : सुरक्ष रक्षकांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:38 IST

विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी सभागृहाचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाईलने सभागृहाचा फोटो काढला.

लोकमत न्यूज नटवर्कनागपूर : विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी सभागृहाचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाईलने सभागृहाचा फोटो काढला. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर सुरक्षा यंत्रणेला जाग आली. विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला.विधिमंडळाचे सभागृह हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. राज्याचे कायदे या सभागृहात केले जातात. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, सरकार या सर्वोच्च सभागृहात कसे काम करतात. अधिवेशनदरम्यान विधिमंडळाचे कामकाज कसे चालते, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. नागरिकांनाही येथील कामकाज पाहता यावे यासाठी सभागृहात प्रेक्षक गॅलरी असते. शाळा कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा कामकाज पाहण्यासाठी येतात. यासाठी परवानगी घेऊन पास दिली जाते. परंतु या गॅलरीत बसून सभागृहातील कामकाज पाहत असताना प्रेक्षकांसाठी नियम घालून दिले असतात. त्यांचे पालन करणे आवश्यक असते. यामध्ये फोटो काढण्यालाही बंदी आहे.बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असताना अचानक एका व्यक्तीने आपल्या मोबाईलद्वारे सभागृहातील कामकाजाचा फोटो काढला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तालिका अध्यक्ष धर्मराबबाबा आत्राम यांच्यासह सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. यावेळी अनेक सदस्यांनीसुद्धा आक्षेप घेतला. प्रेक्षक गॅलरीतील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेऊन कारवाई केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाArrestअटक