शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिमेत फिल गुड की ‘बाबां’चा मंत्र!

By admin | Updated: June 9, 2014 01:25 IST

दोन दशकापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघात यावेळी ‘फिल गुड’ की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विकास मंत्र, हे अद्याप स्पष्ट नाही.

काँग्रेसमध्ये घमासान : भाजपचे अनेक दावेदार  नागपूर : दोन दशकापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघात यावेळी ‘फिल गुड’ की मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांचा विकास मंत्र, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र पश्‍चिमचे तिकीट मिळविण्यासाठी कॉँग्रेस-भाजपमध्ये घमासान आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार सुधाकरराव देशमुख हे विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत; त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला  जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली होती. मात्र, लोकसभेची लीड पाहता ‘लीड पर रहा वेस्ट, सुधाकरराव  बेस्ट’ असे देशमुख सर्मथक बोलू  लागले आहेत. सुधाकरराव गडकरींचे निवडणूक प्रभारी होते, हे विशेष!काँग्रेस नेते दत्ता मेघे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जोरात असताना, येथील इच्छुक भाजप उमेदवारांना ‘नवतपा’ लागला आहे. दत्ताभाऊ  भाजपमध्ये आल्यास मेघे पुत्रांना पश्‍चिमध्ये संधी आहे. गडकरींनी सागर यांच्या वर्धेची तिकीट रोखून ठेवली होती, हे लपलेले नाही. असे असले तरी  लोकसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवक मुन्ना पोकुलवार, मीना चौधरी यांचे पुत्र कमलेश चौधरी (केदार गट) यांची मोट बांधून गडकरींसाठी  जोमाने लागलेले अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू शशिकांत बोदड, राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्याशी मैत्री असलेले रमेश चोपडे, नगरसेवक जगदीश  ग्वालबन्सी यांचाही दावा तगडा आहे. एकेकाळी काँग्रेसी मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मतदार संघात काँग्रेसला गत दोन दशकात मतदारांनी हात दिलेला नाही. काँग्रेसचे दिग्गज  नेते राजकीय वजन वापरून पश्‍चिमचे तिकीट आणतात, मात्र पराभूत होतात. २00९ मध्ये लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला ९ हजार ७१६ मतांची आघाडी होती. भाजपने लागलीच धोका ओळखला. यानंतर तीन महिन्यांनी  झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे सुधाकरराव देशमुख यांनी बाजी मारली. प्रकाश गजभिये, नितीश ग्वालबन्सीच्या उमेदवारीमुळे  काँग्रेसचे गणित बिघडल्याने मंत्री असतानाही अनिस अहमद यांना परावभाला सामोरे जावे लागले. संघटनात्मक अनुभव असलेले देशमुख यांनी पश्‍चिममध्ये भाजपची अशी बांधणी केली की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली घडी  बसविताच आली नाही. येथे गडकरींना तब्बल ३७ हजार १५ मतांची आघाडी आहे. मनपा निवडणुकीत हरलेले ग्वालबन्सी बंधू काँग्रेससोबत ताकदीने  उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील भाजपची कुणबी नगरसेवकांची टीम तेवढय़ाच ताकदीने कामी लागली. इकडे काँग्रेसकडून वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दावेदारी केल्याने मामला टफ झाला आहे. काँग्रेसच्या मतांचे  गणित बिघडविणारे गजभिये विधान परिषदेवर गेल्याने मुळक रिलॅक्स झाले असले तरी, पश्‍चिममध्ये विकासाचा पॅटर्न चालेल की मुख्यमंत्री चव्हाण  यांचा मंत्र, हे काळच सांगेल. मात्र सध्या काँग्रेसचा वर्तमानकाळ वाईट आहे! जिंकण्याची क्षमता नसलेल्यांना या पक्षात तिकीट मिळतात. इकडे  लोकसभेची लीड पाहून माजी मंत्री अनिस अहमद यांची पश्‍चिमकडे वळलेली गाडी एकाएकी थांबल्याचे दिसत आहे. मात्र आम आदमी पार्टीने या मतदार संघात काँग्रेस अथवा भाजपच्या असंतुष्टाला मैदानात उतरविले तर विधानसभेत दोन्ही पक्षाला येथे काहीअंशी  झाप मिळेल, हे निश्‍चित! कारण कॉँग्रेसच्या काही इच्छुक उमेदवारांनी बायोडाटाचे एक पत्र ‘आप’कडेही पाठविले आहे. लोकसभेत ‘आप’ने  काँग्रेसच्या परंपरागत मतांना खिंडार पाडत तब्बल १३ हजार ७६ मते घेतली. मात्र, बहुसंख्य दलित, मुस्लीम, ख्रिश्‍चन, आदिवासी, कुणबी मतदार  असलेल्या या मतदार संघात तिकीट वाटप करताना दोन्ही पक्षांना जातीय समीकरणाचाही विचार करावा लागेल, हे निश्‍चित.