शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’साठी तीन वर्ष सुटीची अट होणार रद्द?

By admin | Updated: March 21, 2017 02:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम कडक केल्याने शेकडो उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंचे संकेत, विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्पष्टीकरणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम कडक केल्याने शेकडो उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर ‘पीएचडी’साठी तीन वर्ष सुटीची अट रद्द होण्याची चिन्हे आहेत. खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीच तसे संकेत दिले आहेत. जर हा निर्णय झाला तर ‘पीएचडी’साठी इच्छुक असलेल्या अनेक शिक्षकांचा जीव भांड्यात पडणार आहे.‘पीएचडी’ नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंत ‘आरआरसी’च्या (रिसर्च अ‍ॅन्ड रिकग्निशन कमिटी) बैठकी चालल्या. ‘आरआरसी’चे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आले आणि अनेकांना धक्काच बसला. ‘पीएचडी’साठी नोंदणी करायची असेल तर संबंधित उमेदवारांनी आस्थापनांच्या व्यवस्थापनांकडून तीन वर्ष रजेचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य असल्याची सूचना लिहिण्यात आली होती. हे प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत सादर केले तरच नोंदणी शक्य होणार आहे, असे त्यात नमूद होते. एका महिन्यात तीन वर्षांची रजा मंजूर करून घेणे अनेकांसाठी अशक्यप्राय बाब आहे. खासगी व्यवस्थापनांत तर तीन वर्षांची रजा कधीच देण्यात येणार नाही. त्यामुळे आमची ‘पीएचडी’ नोंदणीचीच संधी हुकते की काय, अशी भीती अनेक उमेदवारांनी व्यक्त केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएचडी’ ही नियमित पूर्णकालीन पदवी असल्याचे नियमांत नमूद केले आहे. पूर्णकालीन पदवी असताना उमेदवार इतर शिक्षण किंवा इतर ठिकाणी नोकरी कशी करू शकणार, असा तर्क ठेवत विद्यापीठाने ही अट लावली होती. याबाबत आयोगाकडे अनेक तक्रारी गेल्या. यावर अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्टीकरण जारी केले. ‘पीएचडी’ पदवी ही नियमित असली तरी ती पूर्णकालीन किंवा अंशकालीन तत्त्वावर घेतली जाऊ शकते. केवळ ती विद्यापीठांच्या नियमांच्या मर्यादेत असावी. केवळ दूरस्थ शिक्षण पद्धतीतून घेतलेल्या ‘पीएचडी’ पदवीला मान्यता राहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या स्पष्टोक्तीनंतर तीन वर्ष सुटीची आवश्यकता राहणार नाही, असेच दिसून येत आहे. याबाबत विद्यापीठाला अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र आयोगाच्या संकेतस्थळावर याची प्रत उपलब्ध आहे. आम्हाला पत्र प्राप्त होताच आम्ही पुढील कार्यवाही करू. कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ , असे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)