शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने तोडला ‘पीएफ’चा नियम

By admin | Updated: March 6, 2017 01:52 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आस्थापनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

विभागातील २० आस्थापनांविरोधात फौजदारी खटलेनागपूर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आस्थापनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. २०१६ साली नागपूर कार्यालयातर्फे विभागातील एकूण २० आस्थापनांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यात नागपूर महानगरपालिकेचादेखील समावेश आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत विभागात भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या किती होती, दावे न केलेल्या खात्यांची संख्या किती होती, किती रक्कम काढण्यात आली तसेच नियम तोडणाऱ्या किती आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१६ मध्ये विभागातील एकूण २० आस्थापनांविरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात आले. यात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील आस्थापनांचा समावेश आहे. २०१६ मध्ये कुठलाही दावा न केलेल्या खात्यांची संख्या ६ लाख ९१ हजार २८३ इतकी होती. या खात्यांमध्ये २९८ कोटी ७२ लाख २१ हजार १०८ इतकी रक्कम जमा आहे. या कालावधीत ५९ हजार ९१७ दाव्यांचा निपटारा करण्यात आला व ३१८ कोटी ७२ लाख ९४ हजार ५७५ रुपये काढण्यात आले.सदस्यांच्या निधीची कार्यालयाला माहितीच नाहीदरम्यान, या माहितीच्या अधिकारातून आणखी एक आश्चर्यजनक बाब समोर आली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या १५ लाख १६ हजार ४०५ इतकी होती. मात्र या सदस्यांचा एकूण किती निधी जमा आहे, याची माहितीच कार्यालयाकडे उपलब्ध नाही.विभागात लाखाहून अधिक पेन्शनधारकनागपूर विभागात कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत १ लाख ४ हजार १२३ पेन्शनधारक आहेत. २०१६ मध्ये पेन्शनधारकांना १२ कोटी २४ लाख १४ हजार ६९९ रुपयांचा निधी देण्यात आला. कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत सेवानिवृत्ती, विधवा, अपत्य, आश्रित आई-वडील, अनाथ, स्थायी अक्षमता अशा प्रकारच्या सहा पेन्शनचा समावेश होतो.