शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात पेट्रोलचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:50 IST

पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार १६ जूनपासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहे. १ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरांचा आढावा घेतल्यास या दिवसात पेट्रोलचे दर तब्बल ४.०६ रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देचार रुपयांनी वाढले : महागाईचा न जाणवता धक्का, जीएसटीच्या कर टप्प्यात आणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार १६ जूनपासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहे. १ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरांचा आढावा घेतल्यास या दिवसात पेट्रोलचे दर तब्बल ४.०६ रुपयांनी वाढले आहेत. महागाईचा धक्का लागू न देता तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दर कमी होण्यासाठी पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या करटप्प्यात आणण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.१६ जूनपूर्वी दर १५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या बाजारभावांचा अंदाज घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे. पण आता दरदिवशी रात्री १२ नंतर दर बदलविण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. त्यानुसार १६ जूनपासून दर कमी वा जास्त होत आहेत. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत पेट्रोल ६५ पैशांनी महागले आहेत. तेल कंपन्यांच्या निर्णयानंतर १६ जून ते १५ जुलैपर्यंत पेट्रोलची दरकपात झाली. १ ते ३१ आॅगस्टदरम्यान पेट्रोलमध्ये प्रति लिटर ३.६८ रुपयांची वाढ झाली. दरवाढीवर नेहमीच आंदोलन करणाºया ग्राहक संघटनांनी चुप्पी साधली आहे.प्रतिक्रिया देण्यास अधिकाºयांचा नकारदरदिवशी १० ते ३० पैशांनी पेट्रोलची दरवाढ होत असल्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा अंदाज येत नाही. पण संपूर्ण महिन्याची दरवाढ पाहता ग्राहकांच्या खिशातून कंपन्या हळूहळू पैसा काढत आहेत. अधिकाºयांनी दररोजच्या दरवाढीवर बोलण्यास नकार दिला. दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण प्रत्यक्षात उलटच घडलेले दिसत आहे. खनिज तेलाचे भाव गेल्या काही वर्षांमध्ये उतरलेले आहेत आणि रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्यानंतरही पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ग्राहकांना कधी पेट्रोल दरकपातीचा फायदा होतो तर कधी फटका बसतो. आॅगस्ट महिन्याभरात ग्राहकांच्या खिशातून एक लिटर पेट्रोलमागे जास्तीचे ३.६८ रुपये काढून घेणे चुकीचे असल्याचे ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना सांगितले.