शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

अनावश्यक कर व सेसच्या बोझ्यामुळे वाढले पेट्रोल व डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:08 IST

क्रूड आॅईलचे दर ७२ डॉलर प्रति बॅरल आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर ३५ रुपये असताना अनावश्यक कर आणि सेसच्या बोझ्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ८७.२८ रुपये आणि डिझेल ७६.३४ रुपये खरेदी करावे लागत आहे.

ठळक मुद्देपेट्रोलवर २६ टक्के व्हॅट९ रुपये सेस, डिझेलवर २४ टक्के व्हॅटकेंद्रातर्फे डिझेलवर ८ रुपये सेस

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड आॅईलचे दर ७२ डॉलर प्रति बॅरल आणि त्यापासून देशात निर्मित पेट्रोल आणि डिझेलचे दर ३५ रुपये असताना केंद्र आणि राज्य सरकारचा अनावश्यक कर आणि सेसच्या बोझ्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ८७.२८ रुपये आणि डिझेल ७६.३४ रुपये खरेदी करावे लागत आहे. आधीच महागाईने त्रस्त ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव दराचा भार सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या करटप्प्यात आणण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितल्यामुळे ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल कमी किमतीत मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.

केंद्राने वेळोवेळी वाढविले उत्पादन शुल्कआंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड आॅईलचे दर कमी झाल्यानंतरही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवून ग्राहकांना कमी दराचा फायदा मिळू दिला नाही. देशाच्या विकास कामांसाठी उत्पादन शुल्क वाढविल्याचे सरकारचे मत आहे. सध्या पेट्रोलवर १५.४८ रुपये आणि डिझेलवर १३.५० रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. राज्याप्रमाणे केंद्र सरकारसुद्धा अतिरिक्त कराची आकारणी करून ग्राहकांना जेरीस आणत आहे.

राज्यात पेट्रोलवर ९ रुपये सेसव्हॅटच्या आकारणीनंतरही राज्य सरकारने सेसचा बोझा ग्राहकांवर टाकला आहे. पहिल्या टप्प्यात पेट्रोलवर ३ रुपये दुष्काळी सेस, २०१६ मध्ये पेट्रोलचे दर कमी झाले तेव्हा सेसची वाढ, २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दारूबंदीसंदर्भात दिलेल्या आदेशानंतर कर भरपाईसाठी पेट्रोलवर ३ रुपये सेस, पण २०१७ मध्ये दरवाढीवर ग्राहकांनी ओरड केल्यावर राज्याने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस कमी केला. पण त्यानंतरही पेट्रोलवर राज्य सरकार एकूण ९ रुपये सेस आकारत आहे.आता दुष्काळ नाही वा राज्यातील दारुची दुकाने सुरू झाल्यानंतरही ६ रुपये सेसची आकारणी सुरूच ठेवली आहे. राज्याने अनावश्यक ९ रुपये सेस कमी केल्यास ग्राहकांना पेट्रोल कमी दरात मिळेल, असे गुप्ता म्हणाले.

डिझेलवर ६ रुपये सेस२००१ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांची एनडीए सरकार असताना केंद्राने सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) नावाने डिझेलवर १ टक्के सेस आकारला. हा पैसा देशातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कामी येईल, असे केंद्राचे मत होते. हा सेस फेब्रुवारी २०१६ मध्ये ६ रुपयांवर वाढविला. केंद्राच्या २०१८ च्या बजेटमध्ये सीआरएफचे नाव बदलून सेंट्रल रोड अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड असे केले आणि सेस प्रति लिटर ८ रुपये केला. या पैशातून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते, असे दाखविले जाते. पण प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. लोकांना खड्ड््यातूनच मार्ग काढावा लागतो, अशी स्थिती आहे.

देशात दरवर्षी ३५३६ कोटी लिटर पेट्रोल व ९८४० कोटी लिटर डिझेलची विक्रीदेशात दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलची होणारी विक्री पाहता डिझेलवरील ८ रुपये सेसच्या माध्यमातून सरकारकडे दरवर्षी १ लाख २५ हजार कोटी रुपये जमा होतात. सरकार या पैशातून रस्ते बांधू शकते, पण त्यानंतरही रस्त्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर करण्यात येते. एकीकडे ग्राहकांना डिझेलवर सेस द्यावा लागतो आणि दुसरीकडे टोल नाक्यावर टोलचा भरणा करावा लागतो. हा दुहेरी भार ग्राहकांवर बसतो. त्यानंतरही राज्याच्या सीमेवरील टोल नाक्यावर नागरिकांकडून टोलसह जीएसटीची आकारणी करण्यात येते. एकाच ग्राहकाला कर आणि सेसच्या नावाखाली लुटले जात असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. गुप्ता म्हणाले, रस्त्यांचे बांधकाम करताना लोकांकडून गोळा केलेला कोट्यवधींचा सेंट्रल फंड कंत्राटदारांना दिला जातो. त्यानंतरही होणारी टोलची वसुली चुकीची आहे. त्यामुळे वाहतूकदारांची स्थिती अत्यंत गंभीर असून ते शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहेत.प्रत्यक्षात पंपचालकांचे कमिशन वाढलेच नाही१ आॅगस्ट २०१७ पासून पंपचालकांचे पेट्रोल व डिझेलवरील कमिशन वाढल्याची घोषणा तेल कंपन्यांनी केली होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. तेल कंपन्या पूर्वी पंपचालकांकडून लायसन्स फीस रिकव्हरीच्या (एलएफआर) नावाखाली १००० लिटर पेट्रोलमागे ४७ रुपये घेत होत्या. १ आॅगस्ट २०१७ ला कमिशन वाढविण्याची घोषणा करताच तेल कंपन्यांनी १००० लिटरमागे एलएफआर दर ४७४ रुपयांपर्यंत वाढविले. तर १००० लिटर डिझेलवर ३७ रुपयांऐवजी ३९४ रुपये आकारणी सुरू केली. त्यामुळे वाढलेले कमिशन आपोआप कमी झाले. आता पंपचालकांना प्रति लिटर पेट्रोलमागे ३ रुपये ६ पैसे आणि डिझेलवर २ रुपये ४ पैसे कमिशन मिळत आहे. सरकारने करवाढ केली तेव्हा तेल कंपन्यांनीही एनएफआर वाढवून हात घुतल्याचा आरोप अमित गुप्ता यांनी केला.

इथेनॉल खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना नाहीपेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय घेतला. देशात कररहित पेट्रोल ३५ रुपयांना मिळत असताना सरकारला शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली ४७ रुपये प्रति लिटर दराने इथेनॉलची खरेदी करीत आहे. पेट्रोलच्या तुलनेत २.२० रुपये ग्राहकांकडून जास्त घेण्यात येते. या पैशाचा फायदा शेतकºयांना कधीही झालेला नाही, असा आरोप गुप्ता यांनी केला. देशात जळपास १२० कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २४ टक्के व्हॅटमहाराष्ट्रात पेट्रोलवर २६ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यात २०१० पासून राज्याने इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत १ टक्का अतिरिक्त कराची आकारणी होते. अतिरिक्त करामुळे नागपूर शहराबाहेर डिझेलची सर्वाधिक विक्री होते. नागपुरात २००३ पासून उमरेड रोड, हिंगणा, वाडी येथे दोन आणि काटोल रोड अशा पाच टोल नाक्यावरून टोलची आकारणी करण्यात येते. या टोल नाक्याची मुदत फेब्रुवारी २०१५ रोजी समाप्त झाली. त्यानंतरही राज्याने मुदतवाढ दिल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Petrolपेट्रोल