शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवारांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी हायकोर्टात याचिका; सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:06 IST

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देखोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खोट्या माहितीच्या आधारावर पासपोर्ट मिळविल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १२०-ब, ४०६, ४२०, ४६५, ४६८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. त्यात उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाचे सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, पासपोर्ट अधिकारी मुंबई व नागपूर आणि विजय वडेट्टीवार यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

वडेट्टीवार यांनी पासपोर्टकरिता सर्वप्रथम २९ मे २००१ रोजी अर्ज सादर केला होता. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध दहावर फौजदारी प्रकरणे प्रलंबित होती. परंतु, त्यांनी त्या प्रकरणांची माहिती पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिली नव्हती. पोलिसांच्या अहवालानंतर त्यांच्याविरुद्धचे गुन्हे प्रकाशात आले होते. त्यानंतर त्यांनी पासपोर्टसाठी २५ जानेवारी २००७ रोजी दुसऱ्यांदा अर्ज केला. त्यातही त्यांनी प्रलंबित फौजदारी प्रकरणांची माहिती लपवून ठेवली आणि फौजदारी प्रकरणे प्रलंबित नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिले.

तसेच, पोलिसांचा जुना अहवाल पुढे येऊ नये याकरिता पहिल्या अर्जाची माहिती दिली नाही. गडचिरोली येथे राहणे असताना १० वर्षापासून मुंबईत राहत असल्याचे सांगितले. विदेशात जाण्याकरिता शिक्षणाचे कारण दिले. अशाप्रकारे त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने १९ सप्टेंबर २००७ रोजी पासपोर्ट मिळविला, असा भांगडिया यांचा आरोप आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असेही त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय