शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

‘एअर फेस्ट’विरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: September 26, 2015 03:01 IST

भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापनदिवसानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट-२०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे.

हायकोर्ट : याचिकाकर्त्याच्या दाव्यात आढळले नाही तथ्य

नागपूर : भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापनदिवसानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट-२०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. याविरुद्ध दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विविध बाबी लक्षात घेता फेटाळून लावली.हरेंद्र हंसराज वेद असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते विमा एजन्ट आहेत. हा एअर शो वायुसेनानगर येथील मुख्यालयात करणे धोकादायक आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी प्राणहानी होईल. एअर शो स्थळाच्या सभोवताल दाट लोकवस्ती आहे. एअर शोसाठी स्थळ निवडताना परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला नाही. एअर शोमध्ये हेलिकॉप्टरसह विविध प्रकारच्या विमानांच्या कवायती सादर करण्यात येणार आहेत. यामुळे हा एअर शो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्थानांतरित करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. सहायक सॉलिसिटर जनरल रोहित देव यांनी एअर व्हॉईस मार्शल प्रवीण भट यांच्याशी चर्चा केल्यानंतर याचिकाकर्त्याची भीती निरर्थक असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा उपक्रम प्रजासत्ताक दिवसाला दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व इतर न्यायमूर्ती, केंद्रीय मंत्री, मित्र देशांतील प्रतिनिधी आदी अतिविशेष व्यक्ती उपस्थित असतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. पी.व्ही. कुलकर्णी व अ‍ॅड. एस.के. साबळे तर, राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस.एम. उके यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)