शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’चे संकेतस्थळच ‘अपडेट’ नाही

By admin | Updated: August 29, 2014 01:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘पेट’संदर्भात (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती. अखेर विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया

नागपूर विद्यापीठ : ५ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणारयोगेश पांडे - नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘पेट’संदर्भात (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती. अखेर विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून होणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे तंत्रज्ञानासंदर्भात मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याची माहितीच उपलब्ध नाही. याशिवाय ‘एमकेसीएल’तर्फे संचालित करण्यात येणाऱ्या ‘पेट’चे संकेतस्थळ ‘अपडेट’ करण्यात आलेले नाही. यामुळे ‘आॅनलाईन’ परीक्षेची माहिती ‘आॅनलाईन’च उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.नागपूर विद्यापीठात ‘आॅनलाईन’ ‘पेट’ वर्षातून एकदा घेण्यात येते. दरवर्षी ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून या परीक्षेची प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु विद्यापीठ प्रशासन व ‘एमकेसीएल’ यांच्यात देयकांच्या मुद्यावरील बऱ्याच काळापासून धुमसत असलेला वाद शिगेला पोहोचला अन् ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे ‘पेट’चे काय होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता.अखेरीस ‘पेट’च्या प्रक्रियेच्या तारखा विद्यापीठाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबरपासून ‘आॅनलाईन’ आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आवेदन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन इंग्रजी व मराठी भाषेत करण्यात येणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या सूचनेत ‘एमकेसीएल’तर्फे संचालित ‘पेट’च्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु संबंधित ‘ओअ‍ॅसिस.एमकेसीएल.ओआरजी.एनयूपीईटी’ या संकेतस्थळावर अद्यापही २०१३ या वर्षातील परीक्षेची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारांपर्यंत या परीक्षेची माहिती नेमकी पोहोचणार कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.