शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीपत्रानंतरही मागे घेता येते ट्रस्टची मालमत्ता विकण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:03 IST

पब्लिक ट्रस्टची मालमत्ता विकण्यासाठी अवैध पद्धतीने परवानगी मिळविली गेली असल्यास, ती परवानगी त्या मालमत्तेची अनेक विक्रीपत्रे झाल्यानंतरही मागे घेतली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने सोमवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सहधर्मादाय आयुक्तांना पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्टमध्ये अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पब्लिक ट्रस्टची मालमत्ता विकण्यासाठी अवैध पद्धतीने परवानगी मिळविली गेली असल्यास, ती परवानगी त्या मालमत्तेची अनेक विक्रीपत्रे झाल्यानंतरही मागे घेतली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने सोमवारी दिला.या प्रकरणावर नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. पूर्णपीठातील अन्य दोन सदस्यांमध्ये नागपूर खंडपीठाचे न्या. रवी देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचा समावेश होता. सहधर्मादाय आयुक्त महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट-१९५० मधील कलम ३६(१)(ए) अंतर्गत पब्लिक ट्रस्टची मालमत्ता विकण्याची परवानगी देऊ शकतात तर, कलम ३६(२) अंतर्गत त्यांना ही परवानगी मागे घेण्याचा अधिकार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यपीठाने ‘महादेव देवस्थान, वडाळी व इतर’ प्रकरणामध्ये सहधर्मादाय आयुक्त हे पब्लिक ट्रस्टची मालमत्ता विकण्यासाठी दिलेली परवानगी, त्या मालमत्तेचे विक्रीपत्र झाल्यानंतर मागे घेऊ शकत नाही, असा निर्णय दिला होता. दरम्यान, या न्यायालयाच्या एक सदस्यपीठाला अन्य एका प्रकरणात हा निर्णय अयोग्य वाटल्यामुळे त्यांनी यासंदर्भात उचित खुलासा होण्यासाठी हा मुद्दा पूर्णपीठाकडे वर्ग केला होता. पूर्णपीठाने विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्वाळा दिला आणि ‘महादेव देवस्थान, वडाळी व इतर’ प्रकरणावरील निर्णयासह त्या आधारावर दिल्या गेलेले अन्य सर्व निर्णय अयोग्य घोषित केले.या प्रकरणातून उपस्थित झाला हा मुद्दा२५ आॅक्टोबर २०११ रोजी नागपुरातील सहधर्मादाय आयुक्तांनी वर्धा जिल्ह्यातील पवनारमधील राममंदिर देवस्थानाची १५.१९ एकर जमीन विकण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अविनाश जयस्वाल यांना ती जमीन ११ लाख ५ हजार रुपयांमध्ये विकण्यात आली. ती परवानगी मागे घेण्यात यावी याकरिता देवस्थानचे विश्वस्त दिवंगत सुधाकर देशपांडे व संजय सातदेवे यांनी सप्टेंबर-२०१४ मध्ये अर्ज दाखल केला. तो अर्ज प्रलंबित असताना देवस्थानने १२ जानेवारी २०१५ रोजी जयस्वाल यांना जमिनीचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून दिले. त्यानंतर जयस्वाल यांनी देशपांडे व सातदेवे यांचा अर्ज फेटाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. विक्रीपत्र झाल्यानंतर संबंधित परवानगी मागे घेता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. सहधर्मादाय आयुक्तांनी देशपांडे व सातदेवे यांचा अर्ज प्रलंबित असताना विक्रीपत्र करण्यात आलेल्या कारणावरून जयस्वाल यांचा अर्ज फेटाळून लावला. परिणामी, जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये एक सदस्यपीठाने संबंधित मुद्दा पूर्णपीठाकडे वर्ग केला होता.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय