शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रोड बांधण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:38 IST

सिमेंट रोड बांधण्यासाठी पर्यावरण मंत्रालय किंवा पर्यावरणाशी संबंधित अन्य सक्षम प्राधिकरणांची परवानगी आवश्यक आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली.

ठळक मुद्देहायकोर्टाची सरकारला विचारणा १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये सर्वत्र सिमेंट रोड बांधले जात असून त्याचे विविध दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता सिमेंट रोड बांधण्यासाठी पर्यावरण मंत्रालय किंवा पर्यावरणाशी संबंधित अन्य सक्षम प्राधिकरणांची परवानगी आवश्यक आहे का, अशी विचारणा राज्य सरकारला केली. तसेच, यावर १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ आवश्यक आहे. त्यामुळे सिमेंट रोड बांधताना यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत का आणि सिमेंट रोड बांधण्यासाठी कोणते नियम लागू करण्यात आले आहेत याची माहितीही उत्तरात देण्यात यावी, असे न्यायालयाने सरकारला सांगितले. तसेच, उत्तरासोबत नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे दस्तावेज जोडण्यात यावे असे निर्देशदेखील दिले. गोंदिया जिल्हा परिषदेने १४ नवीन सिमेंट रोडच्या कामांना मंजुरी प्रदान केली आहे. त्याविरुद्ध सदस्य सूरजलाल महारवाडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने सिमेंट रोडचा मुद्दा व्यापकतेने हाताळला. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा व पुनम मून यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय