शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कर्मचाऱ्यांनी घडविले एकजुटीचे प्रदर्शन

By admin | Updated: September 3, 2016 01:09 IST

कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला नागपुरातील विविध संघटनांनी प्रतिसाद दिला. यानिमित्त कर्मचाऱ्यांनी न्यायहक्कासाठी एकजुटीचे प्रदर्शन घडविले.

कामगार विरोधी धोरण घेऊन जा ऽऽ गे मारबतनागपूर : कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला नागपुरातील विविध संघटनांनी प्रतिसाद दिला. यानिमित्त कर्मचाऱ्यांनी न्यायहक्कासाठी एकजुटीचे प्रदर्शन घडविले. संपामुळे सर्वच कार्यालयातील कामकाज ठप्प होते. (प्रतिनिधी)कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी व खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध पुकारलेल्या देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सहभागी नव्हती. वारंवार होणारे संप, काम बंद आंदोलनामुळे कर्मचारी कंटाळल्याने आजच्या संपात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा दावा कास्ट्राईब संघटनेने केला आहे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील ५ लाख कर्मचारी व नागपूर जिल्ह्यातील १० हजार, जि.प.कडील ३५०० कर्मचारी यांनी कामावर उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले. नागपूर जि.प. आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, १३ गटविकास अधिकारी, १३ बालविकास प्रकल्प अधिकारी, ९४ वैद्यकीय अधिकारी, ४८ पशुधन विकास अधिकारी, ५ उपशिक्षण अधिकारी व १३ गटशिक्षण अधिकारी कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी दिली. महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला नाही, त्यांचे महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी आभार मानले. सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक -शिक्षकेतर समन्वय समितीशिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सक्रिय सहभाग घेतला. यात बुधाजी सुरकर, पूजा चौधरी, आनंदराव कारेमोरे, गजानन भोरख, लीलाधर ठाकरे, प्रमोद लोन्हारे, खेमराज कोंडे, शरद भांडारकर, पुरुषोत्तम पंचभाई, सुरेंद्र दंडवते, सुभाष आष्टीकर, वसंतराव नाईक, नामा जाधव, संजय तांबडे, कैशव शास्त्री सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य धर्मादाय कर्मचारी संघटनानागपूर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अंशदायी पेंशन योजना रद्द करणे, रिक्त पदावर भरती करणे, कंत्राटीकरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता लागू करणे आदी मागण्यांसाठी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सक्रिय सहभाग नोंदविला होता. कर्मचाऱ्यांनी १०० टक्के संप यशस्वी केल्याचा दावा विभागीय सचिव शंभू महल्ले यांनी कळविले. प्रादेशिक मनोरुग्णालय २ सप्टेंबरला पुकारलेल्या संपात प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे मनोरुग्णालयाची व्यवस्था कोलमंडली होती. परंतु मनोरुग्णांच्या जेवणाची व्यवस्था कर्मचाऱ्यांनी केली होती. संपात रुग्णालयातील नर्सेस, कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार सहभागी झाले होते.सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे संयुक्त फोरमशंकरनगर चौकातील युनायटेड इंडिया इन्श्योरन्स कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयापुढे संघटनेतर्फे निदर्शने करून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. नॅशनल इन्श्योरन्स कं. आॅफिसर्स असो. चे राजेंद्र सरोज, ओरियंटल इन्श्योरन्स कं. आॅफिसर्स असो. चे नीलेश कोठारी, युनायटेड इंडिया इन्श्योरन्स कं. आॅफिसर्स असो.चे अनिल देवगडे, पेंशनर्स असो.चे अविनाश पुलकतामकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. आॅल इंडिया युनाईटेड ट्रेड युनियन सेंटर केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व सामान्य जनतेच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ए.आय.यू.टी.यू.सीच्या आवाहनावर संप पुकारण्यात आला होता. संघटनेचे माधव भोंडे, संजय सोनेकर, राजेंद्र गंगोत्री, राजपाल विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनकामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागीय कार्यालय व इतर शाखांमधील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. हा संप शंभरटक्के यशस्वी झाल्याचा दावा नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे सरचिटणीस अनिल ढोकपांडे यांनी केला. संपामध्ये एलआयसी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेने एलआयसी मुख्यालयासमोर घेतलेल्या द्वारसभेत केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देऊन रोष व्यक्त केला. कामगार नेते रमेश पाटणे, टी. के. चक्रवर्ती, धनराज डोंगरे यांच्या नेतृत्वात संप यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटनाकेंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या संपात महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेतली. अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करा, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे, महिलांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा आदी मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या. द्वारसभेला सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक दगडे यांनी मार्गदर्शन केले. विदर्भातील आयकर कार्यालय बंदकेंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात आयकर कर्मचारी फेडरेशन आणि राजपत्रित अधिकारी असोसिएशनने सिव्हिल लाईन्स येथील आयकर भवनासमोर सकाळी १०.३० वाजता नारे-निदर्शने केली. संपामुळे नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि खामगांव येथील आयकर कार्यालयातील कामकाज बंद होते. आयकर राजपत्रित अधिकारी असोसिएशनचे सरचिटणीस अतुल आहुजा, आयकर कर्मचारी फेडरेशनचे सरचिटणीस प्रशांत धारकर, कॉन्फेडरेशनचे नेते बी.एन. चिकाटे आणि राजीव सिंगर यांनी सभेत मार्गदर्शन केले. संपाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र जाधव, अनिल रोटके, अरविंद कायंदे, उमेश गहूकर, नागराज, पवित्रन, जितेंद्र भारती, प्रकाश वाकोडे, सुनील चिंतलवार, सुनील पौनीकर, गौतम कुमार, दीपशिखा रहाटे, रेखा नंदनवार, अमोली साखरे, सी.एम. डेकाटे, विनोद कांबळे, विकास पेशने, रमेश बांगडकर, अनिल लोणारे, संजय शहारे, नितीन सहारे, किशोर कनोजिया, सुनील भूलगांवकर, व्ही.एन. मोरे, ठवकर आणि प्रकाश खानझोडे यांनी परिश्रम घेतले. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आयटक, रा.स.कर्म.मध्य.संघटना, सीटू, इंटक, टियूसीसी, एआयटीयूसी या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने २ सप्टेंबरचा संप यशस्वी करून कस्तूरचंद पार्क येथे जाहीर सभा घेतली. मोहनदास नायडू, अशोक दगडे, व्ही. व्ही. असई, एस. क्यू. जामा, बलवंत मेहता, दिलीप माथुर यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा घेण्यात आली. सभेला मनोहर देशकर, श्याम काळे, मारोती वानखेडे, अशोक थूल, चंद्रहास सुटे, नारायण समर्थ, नीलेश नासरे, गुरुप्रीत सिंग, गोपीचंद कातुरे, राजू सुरशे, नितीन सोमकुवर, बी.एन.जे. शर्मा, एल. पी. नंदनवार, अनिल ढोकपांडे, मोहन शर्मा, सी.एम. मौर्य, मोहम्मद ताजुद्दीन, आनंद कारेमोरे, प्रदीप शेंडे, बुधाजी सुरकर, देवेंद्र शिदोडकर, राजेंद्र ढोमए, प्रदीप मिश्रा, सतीश जोशी, नाना महल्ले, प्रतिभा सोनारे, प्रकाश डोंगरे, संजय सोनटक्के आदींनी मार्गदर्शन केले. कस्तूरचंद पार्कवर झालेल्या जाहीरसभेत १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा नेत्यांनी केला. आभार व्ही.व्ही. असई यांनी मानले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखाकर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात नागपूर जिल्ह्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी भागीदारी करून एकजुटीचे प्रदर्शन करून १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा केला. सकाळपासून शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, डागा, मेयो हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, वनभवन, सामाजिक न्याय विभाग आदी कार्यालयात शुकशुकाट होता. देशव्यापी संपात सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन १०० टक्के संप यशस्वी केला आहे, असा दावा चंद्रहास सुटे, अशोक दगडे, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, नना कडवे, ज्ञानेश्वर महल्ले, प्रकाश डोंगरे आदींनी केला.सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)सीटू जिल्हा कमिटी अध्यक्ष मो. ताजुद्दीन व महासचिव दिलीप देशपांडे यांनी १०० टक्के संप यशस्वी झाल्याबद्दल मजूर व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. वेगवेगळ्या आस्थापनात असलेल्या सीटूच्या संलग्नित युनियनमध्ये हा संप १०० टक्के यशस्वी राहिला. कोळसा उद्योग, औषधी उद्योग, वैद्यकीय विक्री प्रतिनिधी, मद्य व्यवसाय, रोजगार हमी योजना, केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, राष्ट्रीय निंबुवर्गीय अनुसंधान केंद्र, सिक्युरिटी ट्रान्स इंडिया प्रा. लि. महात्मे आय हॉस्पिटल, पॉवर ग्रीड, व्हीएनआयटी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स आदी कर्मचाऱ्यांनी संप केला.